हडकणी मुख्य रस्ता डांबरीकरण कामाचे भुमीपुजन संपन्न

चिपळुण /प्रतिनीधी: ( विलास गुरव) चिपळूण तालुक्यातील कोकरे जिल्हा परिषद गटातील मौजे हडकणी गावात आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून 3054 रस्ते पुल दुरुस्ती योजनेंतर्गत गट ब योजनेतून मंजूर असलेल्या मूख्य हडकणी मुख्य रस्ता डांबरीकरणाचे भुमीपुजन चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन (अबु ठसाळे) गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ ,महिला यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांचा मतदार संघात विकास कामांचा धडाका सुरू आहे. मतदार संघातील ग्रामस्थांचा आपल्या गावातील विविध समस्या घेवून आमदार निकमांकडे जाण्याचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी न पाहता लोकांची कामे तात्काळ पार पाडणे; यामुळे जनमानसात त्यांचे एक वेगळेच आपुलकीचे स्नेह-संबंध प्रस्थापित झाले आहेत. हडकणी येथील ग्रामस्थांनी रस्त्यासंदर्भात आपली समस्या आमदार निकमांकडे असता सदर रस्ता करिता 3054 रस्ते पुल दुरुस्ती योजनेंतर्गत गट ब योजनेतून मंजूर करून घेतला .हडकणी गावात याआधी आमदार शेखर निकम यांनी मौजे हडकणी घागवाडी गणेश विसर्जन घाट बांधणे – 4 लाख,मौजे सावर्डा हडकणी रस्ता ब्रीज – 80 लाख,मोजे हडकणी सतीचीवाडी स्मशानशेड बांधणे – 4 लाख,मौजे हडकणी संरक्षक भिंत बांधणे – 5 लाख, मौजे हडकणी घाणेकरवाडी रस्ता डांबरीकरण करणे – 5 लाख,मौजे हडकणी बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण करणे – 6 लाख, सेच सदर रस्ता व इतर कामे मंजूर केलेली आहेत. यातील काही कामे पुर्ण झालेली असून उर्वरीत कामे प्रगती पथावर आहेत. हडकणी गावामध्ये विकास कामांसाठी लाखो रुपयांचा विकास निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी व लोकप्रतिनिधींनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन (अबु) ठसाळे, अध्यक्ष दत्ताशेठ गुजर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोकरे जिल्हा परिषद गट अध्यक्ष संजय कदम, सुधीर राजेशिर्के, येगाव उपसरपंच सचिन चव्हाण, सरपंच नितीन सावंत, उपसरपंच श्रीपत आग्रे, सदस्य पांडुरंग घाग, माजी सरपंच अण्णा घाग, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अरुण अधटराव, विजय घाग, अशोक घाग, सतीश घाग, अमीत घाग, अनंत घाग, मंगेश घाग, अशोक जाधव, अशोक पांचाळ, राजेश घाणेकर, नामदेव घाणेकर, गोविंद मांडवकर, रमेश मते, गंगाराम म्हादे, रमेश मते, सुभाष खांबे, गोपिनाथ धुमक, प्रकाश पांचाळ, विजय म्हादे, रविंद्र शिगवण, विलास पांचाळ, गोपाळ घाणेकर तसेच महिला मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.