बापरे!!, या वर्षी पासून पृथ्वीवर पहिले चुंबन घेण्याची पद्धत झाली सुरू, जाणून विश्वास बसणार नाही…

48
kiss

आपल्यापैकी अनेकांनी चुंबन हा शब्द ऐकला असेल, वाचला असेल परंतु या चुंबनाला पृथ्वीतलावावर कधी सुरुवात झाली याबद्दल फारशी माहिती नसते. चुंबन म्हणजेच आपण याला इंग्रजीमध्ये किसिंग देखील म्हणतो. हल्ली किसिंग सीन घडणाऱ्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात आणि अशावेळी नेमके पहिले चुंबन केव्हा घेतले गेले असावे ? असा प्रश्न देखील मनामध्ये निर्माण होतो. जर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला असेल तर त्याचे उत्तर शोधण्यासाठी आज आम्ही तुम्हाला माहीती सांगणार आहोत.

जेव्हापासून पृथ्वी तलावावर स्त्री पुरुष अस्तित्वात आले तेव्हापासूनच मानवी संस्कृती अस्तित्वात आलेली आहे याची कल्पना आपल्याला आहे. त्याचबरोबर माणसाला सर्व भावना आहेत. सुख दुःख नाती, कामुक भावना, प्रेमभावना या सर्व त्याच्या अंतरंगात आहेत. या सर्व भावनांच्या एकत्रित करण्यातूनच चुंबन प्रक्रिया अस्तित्वात आलेली असावी असे देखील म्हटले जात आहे परंतु ही पद्धत नेमकी कधी अस्तित्वात आली? याबद्दल फारसे कुणाला ठाऊक नाही, हा देखील एक संशोधनाचा विषय मानला गेला आहे.

अनेक वर्षांपूर्वीच्या शिल्पांचा अभ्यास करून ही प्रथा नेमकी कधी आलेली असावी याचा सतत अभ्यास करून संशोधन करण्याचे प्रयत्न संशोधक करत आहेत. अनेक संशोधकांच्या मतानुसार चार हजार पाचशे वर्षांपूर्वी प्राचीन मध्य पूर्वेतील समाजात ओठावर चुंबन घेणे ही एक सामान्य प्रथा होती परंतु त्यापूर्वीच्या कागदपत्रानुसार हजार वर्षांपूर्वी सर्वांच्या समोर ओठावर चुंबन घ्यायचे ही एक माहिती समोर आलेली आहे.

काही कागदपत्रांच्या मते दक्षिण आशियामध्ये 3500 वर्षांपूर्वी मानवी चुंबन घेण्याची प्रथा रूढ झाली. दगडावर कोरण्यात आलेल्या काही शिल्पांच्या मदतीने देखील चुंबन पद्धत अस्तित्वात होती याचे पुरावे मिळाले आहेत.

चुंबन ही प्रक्रिया जरी मानली असली तरी ती आत्महत्या व्यक्त करण्याचे साधन देखील समजले जात होते म्हणूनच एकत्रित कुटुंब पद्धतीत राहत असताना एकमेकांकडे आपल्या भावना चुंबन हा एक मार्ग निवडला जात असे.

अनेक धर्मग्रंथ शास्त्रामध्ये देखील चुंबनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलेले आहेत. ऋग्वेद शास्त्रामध्ये देखील लहान मुलाच्या कपाळावर चुंबन करण्याचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये देखील लग्न करतेवेळी वधूच्या कपाळावर चुंबन करण्याची पद्धत आहे.

BIG BREAKING NEWS PUNE : पुण्यात वाजणार प्रचाराचे बिगुल? लवकरच लोकसभेची पोटनिवडणूक होईल जाहीर!…

अशाप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने चुंबन म्हणजेच किसिंग करणे ही अनेकदा प्रथा मानली गेलेली आहे आणि हीच प्रथा कालांतराने विस्तारित झालेली आहे. वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये म्हणजेच कामसूत्रांमध्ये देखील चुंबनाचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करण्यात आलेला आहे आणि काम क्रीडा प्रगल्भ करण्यात आलेली आहे.