महाराष्ट्रात लवकरच मान्सून होणार दाखल, भारतीय हवामानाची महत्वाची माहिती समोर !

46
Monsoon will arrive in Maharashtra soon, important information about Indian weather is here!

भारतीय हवामानाने नुकतीच महत्त्वाची माहिती जाहीर केलेली आहे. या माहितीनुसार मुंबईत मान्सून 11 ते 12 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, त्याचबरोबर वायव्य भारतात 30 मे पर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची देखील चिन्हे दिसून येणार आहेत.

येणाऱ्या दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी काही सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामानाने दिलेली आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून हा बंगालच्या उपसागरामध्ये दाखल झालेला असून तो मान्सून अंदमान निकोबार बेटावरच रेंगाळलेला आहे त्यामुळे मान्सूनचा वेग मंदावलेला आहे.

येणाऱ्या सात जून नंतर मान्सून गतीने पुढे सरकेल, अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट वेदर या खाजगी संस्थाने हा अंदाज वर्तवलेला आहे.

यावर्षी मान्सूनचे आगमन चार दिवस उशिरा होईल. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दरवर्षी 1 जून रोजी मान्सून हा केरळमध्ये दाखल होतो परंतु यंदा तो चार जून रोजी दाखल होणार आहे, त्याचबरोबर केरळमध्ये 7 जून नंतर मुसळधार पाऊस देखील होईल, अशी शक्यता स्कायमेट या खाजगी संस्थेने दिलेली आहे.

महाराष्ट्र मध्ये हा मान्सून 9 जून तर मुंबईमध्ये 15 जून दरम्यान दाखल होईल, असे देखील सांगितले जात आहे. असा अंदाज वेगारीस ऑफ द वेदर कडून वर्तवण्यात आलेला आहे.

BIG BREAKING NEWS PUNE : पुण्यात वाजणार प्रचाराचे बिगुल? लवकरच लोकसभेची पोटनिवडणूक होईल जाहीर!…

महाराष्ट्र मध्ये भरपूर प्रमाणात तापमान बदललेले आहे. सगळीकडे सूर्याचा प्रकोप पाहायला मिळत आहे, अशावेळी येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानामध्ये घट होईल असे देखील सांगितले जात आहे तसेच ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरीदेखील बरसतील असे सांगण्यात येत आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील लोकांना वातावरणात मधील गारवा अनुभवायला मिळेल असे चित्र दिसून येईल.