मेट्रो प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अगदी महत्त्वाची बातमी आहे. यापुढे तुम्हाला मेट्रोचे तिकीट बुक करण्यासाठी लांब रांग लावावी लागणार नाही. तुम्ही थेट तुमच्या व्हाट्सअप ऍप्लिकेशनच्या मदतीने मेट्रोचे तिकीट बुक करू शकता, यामुळे तुमचा वेळ ही वाचेल आणि तुमच्या प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही.
प्रवाशीं चा प्रवास सोपा आणि सुकर व्हावा याकरिता मेट्रो ने ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तसेच प्रवास करण्याचा अनुभव चांगला सुधारण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन व्हाट्सअप च्या माध्यमातून तिकीट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
हे तिकीट काढण्यासाठी तुम्हाला क्यूआर कोडची मदत घ्यावी लागणार आहे. तुम्ही तिकीट सहज बुक तयार करू शकता. डी एम आर सी चे व्यवस्थापक संचालक डॉक्टर विकास कुमार यांच्यासोबतच अन्य अधिकाऱ्यांनी या सुविधा चे उद्घाटन केले. या सुविधामुळे मेट्रो ट्रेनच्या प्रवाशांना आता तिकीट काढण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच लांब रांगा देखील लावाव्या लागणार नाहीत.
या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही व्हाट्सअप वर सहज टिकिट बुक करू शकता…
सर्वात आधी तुम्हाला डीएमआरसी च्या अधिकृत व्हाट्सअप क्रमांक 9650855800 हा तुमच्या फोन मध्ये सेव करावा लागेल.
यानंतर चॅटबॉट QR कोड स्कॅन च्या मदतीने तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करू शकता, जो सर्व विमानतळ एक्सप्रेस लाईन तिकिटावर आणि ग्राहक सेवा आपल्याला दिसून येतो.
व्हाट्सअप वरून तुम्हाला अधिकृत नंबर वर “हाय” असा मेसेज पाठवावा लागेल. यानंतर लिस्टमध्ये आपल्याला जे ठिकाण हवे आहे, ते निवडायचे. त्यानंतर तिकीट खरेदी शेवटच्या प्रवासाचे तिकीट, तिकीट पुन्हा प्राप्त करण्याचा पर्याय आपल्याला निवडायचा. त्यानंतर सोर्स स्टेशन, डेस्टिनेशन स्टेशन आवश्यक असलेली सर्व माहिती आपल्याला भरायचे आहे आणि तिकीट खरेदी करायची आहे.
या स्टेज फॉलो केल्यानंतर तुम्ही इंटिग्रेटेड पेमेंट गेटवे चा वापर करून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा यूपीआयच्या मदतीने सुरक्षित पेमेंट करू शकता. यानंतर तुम्हाला व्हाट्सअप चॅट मध्ये क्यूआर कोड तिकीट मिळेल यानंतर स्मार्टफोनवरील किंवा कोड योग्य एएफसी गेट स्कॅनर वर स्कॅन करा आणि कोणताही अडथळा शिवाय प्रवास करा. या काही पायऱ्यांचा वापर करून तुम्ही तुमचा प्रवास अगदी आनंदात करू शकता.