बार्बेक्यू नेशन तर्फे मँगो मेनिया फूड फेस्टिव्हलची सुरुवात

41

पुणे : बार्बेक्यू नेशन तर्फे बहुप्रतिक्षित अशा मँगो मेनिया फूड फेस्टिव्हल च्या माध्यमातून फळांचा राजा असलेल्या आंब्याच्या मौसमाला साजरा करण्यासाठी सुरुवात केल्याची घोषणा केली.  १९ मे ते ३१ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिव्हल मध्ये बार्बेक्यू नेशन कडून पुणे येथील ग्राहकांचे स्वागत हे आंब्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध पदार्थांनी करण्यात येणार आहे.  यामध्ये अगदी पेयांपासून ते सलाड्स, स्टार्टर्स तसेच अगदी मेनकोर्स आणि मिठाई यांचा समावेश असून यामध्ये आकर्षक आंब्याच्या चवीचा आनंद ग्राहकांना घेता येणार आहे. 

बार्बेक्यू नेशन मध्ये असलेल्या इट ऑल यू कॅन बफे मध्ये ७० हून अधिक डिशेश असून यांत शाकाहारी आणि मांसाहारी अशा १८ डिशेस आंब्यापासून प्रोत्साहन घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. पाहुण्याना प्रसिध्द भारतीय पेय आंब्याचे पन्हे प्राप्त होऊन त्यानंतर आकर्षक खाद्यपदार्थ देण्यात येणार आहेत.  मांसाहाराची आवड असणार्‍यांसाठी कच्ची आंबी तंगडी आणि मँगो मस्टर्ड फिश तर शाकाहाराची आवड असणार्‍यांसाठी तोडाला पाणी सोडणार्‍या मँगो मिंट ग्रिल्ड व्हेज, कच्चे आम के कबाब, मँगो चिली पायनॅप्पल  आणि क्रिस्पी कॉर्न विथ मँगो यांचा समावेश आहे.  सलाड सेक्शन मध्ये मँगो कॉर्न चाट, मँगो  पायनॅप्पल सलाड, मँगो पायनॅप्पल सालसा आणि स्पायसी मँगो चिली यांचा समावेश आहे. मांसाहारी मेन कोर्स मध्ये कच्चा आंबी फिश करी तर शाकाहारी मेन कोर्स मध्ये आंबी दाल तडका, आणि आमी मिक्स व्हेज चा समावेश आहे.  डेझर्ट विभागात मँगो पेस्ट्री, मँगो सरप्राईज आणि आमरस यांचा समावेश आहे.  शेफ ने आंब्याचे विविध स्वाद एकत्र करुन नवीन अशा आवडीच्या डेझर्ट्सची निर्मिती केली आहे.        

बार्बेक्यू नेशन विषयी

बार्बेक्यु नेशन ने भारतात प्रथमच डीआयवाय (डू ईट युवरसेल्फ) ची संकल्पना आणून मुंबईत २००६ मध्ये सुरु करण्यात आलेल्या पहिल्या आऊटलेट मध्ये लाईव्ह ऑन दि टेबल ग्रील ची संकल्पना सुरू केली. बार्बेक्यु नेशन ने नेहमीच सोपा असा दृष्टिकोन ठेऊन आकर्षक किंमतीत ग्राहकांना सर्वोत्कृष्ट भोजनाचा आनंद  देऊ केला आहे.  सेवांमध्ये सर्व प्रकारची वाढ करत ही शृंखला त्यांनी वेगाने वाढवली आहे. गेल्या १५ हून अधिक वर्षांच्या कालावधीत बार्बेक्यु नेशन ने संपूर्ण भारतातील तसेच परदेशातील ८० हून अधिक शहरांत २०० हून अधिक आऊटलेट्स सुरु केली आहेत.  या कालावधीत ब्रॅन्ड ने नाविन्य आणत लाईव्ह काऊंटर्स, विविध कुल्फीचे प्रकार आणि अनोखी उत्पादन श्रेणी बार्बेक्यू इन अ बॉक्स सुरू केली आहे.

हे हि वाचा : हा CUTE मुलगा आज लाखोंच्या हृदयावर करतोय राज्य, पत्नी तर दिसते इतकी सुंदर की पाहून व्हाल थक्क!