आजच्या काळात बाहेरचं अन्न मोठ्या आवडीनं खाल्लं जातं. फास्ट फूडला खूप मागणी आहे. याचं कारण म्हणजे लोकांना फार वेळ नसणं. जेव्हा लोक व्यस्त असतात तेव्हा ते बाहेरून अन्न मागवण्यास प्राधान्य देतात.
रेस्टॉरंटचे रिव्ह्यू वाचून किंवा तिथे जाऊन लोक आजूबाजूला पाहतात. त्यानंतरच ते तिथून जेवण ऑर्डर करतात. पण रेस्टॉरंटच्या किचनकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही.
अशा परिस्थितीत अनेकवेळा लोकांना जेवणाची ऑर्डर दिल्यावर पश्चाताप होतो. अशीच चूक करणाऱ्या व्यक्तीने त्याच्यासोबत घडलेली एक घटना शेअर केली.
ममॅक रेस्टॉरंटची साखळी मलेशियामध्ये खूप प्रसिद्ध आहे. येथे अन्न चोवीस तास उपलब्ध असतं. तसंच अन्न खूप स्वस्त असतं. त्यामुळे ही फूड चेन प्रसिद्ध आहे. लोकांना इथून जेवण ऑर्डर करायला आवडतं.
मात्र एका व्यक्तीने या ठिकाणाहून फ्राईड चिकन मागवलं असता, त्याला मिळालेल्या अन्नात किडे आढळून आले. ही घटना ट्विटरवर शेअर केली गेली आहे. अर्ध्या खाल्लेल्या चिकनच्या पिसमध्ये आत अळ्या असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतं.
Jijik… Banyak pulak ulat kat ayam tu… Redha je lah kalau dh termasuk dalam perut… pic.twitter.com/AvwjWsHcYF
— MALAYSIA MOST VIRAL (@MALAYSIAVIRALLL) April 18, 2023
त्या व्यक्तीने सांगितलं की त्याने ममॅक रेस्टॉरंटबद्दल बरंच काही ऐकलं आहे. या कारणास्तव, त्याने तिथून जेवण ऑर्डर केलं. त्याने स्वत:साठी फ्राईड चिकन ऑर्डर केलं.
मात्र अर्धा पीस खाल्ल्यावर त्याला धक्काच बसला. त्याला चिकनच्या आत अनेक किडे दिसले. त्यानी लगेचच त्याचा व्हिडिओ बनवला. याबाबत रेस्टॉरंटकडे तक्रार केली असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
याचा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच लोकांच्या कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. अनेकांनी तत्काळ रेस्टॉरंटवर बंदी घालण्याची मागणी केली. चिकनच्या आत प्रचंड किडे दिसत होते.
बऱ्याच लोकांनी रेस्टॉरंटबद्दल वाईट रिव्ह्यू लिहिले. असं घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा आणखी अनेक घटना या रेस्टॉरंटमधून समोर आल्या आहेत. त्यानंतरही ते बंद करण्यात आलेलं नाही. आता या ताज्या व्हिडिओनंतर, रेस्टॉरंट बंद होऊ शकतं.