Maharashtra Board HSC Result 2023: निकालाच्या वेळेत झाला बदल; दुपारी 1 ऐवजी इतके वाजता लागणार रिझल्ट

93

महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. अखेर विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे. निकालाची तारीख बोर्डाकडून जारी करण्यात आली आहे.

स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल हा उद्या म्हणजेच 25 मे 2023 रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या पोटात गोळा आला आहे. मात्र यंदा निकालाच्या वेळेत मात्र बदल करण्यात आला आहे.

PUNE NEWS: पुण्यात अधिकाऱ्याची मुजोरी, लाथ मारून उडवला स्टॉल; पाहा धक्कादायक VIDEO

ऑनलाईन जाहीर होणाऱ्या या निकालाची वेळ मात्र थोडीशी बदलण्यात आली आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र निकाल हा एक तास उशिरा म्हणजे दोन वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे.

हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत.

विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडू मिळाली आहे.

बारावीच्या निकालादरम्यान विद्यार्थ्यांना निकाल बघण्यास झालेली अडचण बघता बारावीच्या निकालाच्या (Result MH HSC result) दिवशी अशी अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे.