LONIKALBHOR : संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

45

लोणी काळभोर (पुणे प्रहार-सचिन सुंबे) : जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा यंदा लोणी काळभोर गावातील विठ्ठल मंदिरात मुक्कामी आणण्या बाबतीत पालखी सोहळा प्रमुखांनी अजुन निर्णय घेतलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आज रविवार( दि. ४ जून )लोणी काळभोर ग्रामस्थांची एक महत्वपूर्ण बैठकीचे पार पडली.

त्यामध्ये पालखी लोणी गावात आली नाही तर त्यादिवशी गाव स्वयंपुर्तीने बंद करुन निषेध व्यक्त केला जाईल .आणि वारीला कुठल्याही प्रकारचे सहकार्य केले जाणार नसल्याचे ग्रामस्थांनी जाहीर केले.

सरपंच योगेश काळभोर यांनी बोलविलेल्या बैठकीत मध्ये ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे विश्वस्त विश्वस्थानवर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

50 ते 60 वर्षाची परंपरा मोडीत काढून पालखी गावात न आणण्याचे सांगत असले तरी लोणी ग्रामस्थ पालखी गावात आलीच पाहिजे या निर्णयावर ठाम आहेत.

आजच्या बैठकीत सरपंच योगेश काळभोर ,हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर ,हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर ,सूर्यकांत आप्पा काळभोर , माजी सरपंच शरद काळभोर ,माऊली पाटील काळभोर, विठ्ठल काळभोर ,संतोष भोसले ,बाळासाहेब जयवंत काळभोर, गणेश काळभोर ,रेहमान इनामदार, रशीद इनामदार, फैयाज इनामदार, इरफान शेख, रियाज शेख .आदी उपस्थित होते.

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा व्यवस्थित सुरळीत आहे. त्या ठिकाणी कोणताही वाद नाही, विसंवाद नाही. काही मर्यादा नाहीत मग लोणी काळभोर व उरुळी कांचन या ठिकाणी दाखल होणाऱ्या संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीला का अडचण येते याचे नेमके कारण अजूनही समजू शकले नाही.

मात्र लोणी काळभोर व उरुळी कांचन गावातील नागरिकांमध्ये पालखी सोहळ्याच्या विसावा व मुक्कामा बाबतीत निर्णय घेणा-या संबंधितां बद्दल प्रचंड नाराजी वाढली आहे. या संदर्भात ठोस व ठाम निर्णय अजूनही विश्वस्थांनी घेतला नसल्याने आजची बैठकीचे आयोजन केले होते.

सर्वात प्रथम वडापाव कोणी बनवला; जाणून घ्या यामागील रंजक गोष्ट

यावेळी सरपंच योगेश काळभोर यांनी सांगितले की पालखी मुक्कामासाठी सर्व संबंधितांना पत्रक देऊन पालखी मुक्काम लोणी गावातच झाला पाहिजे अशी विनंती करण्यात येणार आहे. पालखी मंदिरात ठेवून दिंड्या पालखी मैदानावर विसाव्या साठी थांबविल्या पाहिजे . रितीरिवाजाप्रमाणे पालखी विठ्ठल मंदिरातच असावी याबाबत ग्रामस्थ काही झाले तरी पालखी गावातच आली पाहिजे.

संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामासाठी विश्वस्थांच्या विरोधात ग्रामस्थांनी यलगार पुकारला असुन तसा आक्रमक पवित्रा घेणार असून तसा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असल्याचे सरपंच योगेश काळभोर यांनी सांगितले.यावेळी शिवसेनेचे संतोष भोसले यांनी सांगितले की ५०ते ६० वर्षापासून असलेली परंपरा पालखीचे विश्वस्त मोडुन काढत आहेत. त्यामुळे पालखी सोहळा गावातील विठ्ठल मंदिरातच आला पाहिजे असे भोसले यांनी सांगितले.