दिव्यांगांना मिळणार पाच लाखांपर्यंत कर्ज; जिल्ह्यात १५ वर्षांत ४२९ लाभार्थी

85

पुणे : दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून दिव्यांगांना ५० हजारांपासून पाच लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. २००२ पासून सुरु झालेल्या या योजनेत २०१७ पर्यंतच्या १५ वर्षात जिल्ह्यांत ४२९ जणांना या मुदत कर्जाचा लाभ झाला आहे.

गेल्या पाच वर्षांत एकही लाभार्थी नसला तरी यंदाच्या आर्थिक वर्षात पात्र लाभार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून दिव्यांगांना तीन प्रकारच्या कर्जाचे वाटप केले जाते. त्यात वैयक्तिक, मुदतफेड व शैक्षणिक कारणांसाठी कर्जवाटपाचा समावेश आहे. महामंडळाच्या स्थापनेपासून अर्थात २००२ पासून या योजनांचा लाभ देण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा : BIG BREAKING : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? ‘या’ नावाने असणार नवीन जिल्हा?

वैयक्तिक कर्ज लाभ योजनेत पूर्वी २० हजारांपर्यंतचे कर्जवाटप केले जात होते. त्यासाठी राज्य सरकारचे अनुदान दिले जाते. आता ही रक्कम ५० हजार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

२००२ ते २०१७ या कालावधीत जिल्ह्यात या योजनेतून ३८ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. मुदत कर्ज योजनेत ५० हजारांपासून ५ लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते. त्यात केंद्राचा ९० टक्के व राज्याचा ५ टक्के व स्वहिस्सा ५ टक्के असतो. महिलांसाठी या कर्जाचा व्याजदर ५ टक्के, तर पुरुषांसाठी हाच व्याजदर ६ टक्के इतका असतो.

मतिमंद महिलांसाठी ४.५, मतिमंद पुरुषांसाठी ५.५ टक्के व्याजदर असतो. कर्ज फेडण्यासाठी ५ वर्षांची मुदत असते, तर शैक्षणिक कर्जासाठी विद्याथ्र्यांच्या मागणीनुसार वाटप करण्यात येते.

VIDEO : धक्कादायक : पुण्यातल्या पोलीसांना ‘राजकीय हात’ लागतोच कशाला? पुण्यात पोलीसांचे चाललंय काय? अल्पवयीन मुलांना पोलीसांकडुन जबर मारहाण; कुटुंबीयांना शिवीगाळ तसेच उर्मट भाषा वापरल्याची माहिती

जिल्ह्यातून ४६८ लाभार्थी : या तिन्ही योजनांचा आतापर्यंत ४६८ जणांनी लाभ घेतला आहे. त्यात वैयक्तिक कर्ज योजनेत ३८ मुदत कर्ज योजनेतून ४२९, तर शैक्षणिक कर्ज योजनेत एकाने लाभ घेतला आहे.

स्वतःचा व्यवसाय तसेच इतर कामांसाठी कर्जाचा लाभ घ्यावयाचा असल्यास महामंडळाकडे रीतसर अर्ज करावा. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. पात्र उमेदवारांनी त्याचा लाभ घ्यावा. – सविता मोरे, वसुली निरीक्षक, दिव्यांग महामंडळ