भारत हा कृषिप्रधान देश आहे. या भारतामध्ये अनेक असे काही शेतकरी आहेत, जे नवीन नवीन प्रयोग करत असतात. आपल्या ज्ञानाच्या मदतीने शेती करत असताना विविध प्रयोग करून शेतीतून पैसा कमवत असतात, असाच एक प्रयोग दोन शेतकरी बंधूंनी केलेला आहे.
या लोकांनी हजारो लिटर ताक गावकऱ्यांना वाटून उरलेले ताक पाईपलाईनच्या मदतीने एका टाकीत सोडून ते गाईंना पाजले आणि त्यानंतर जे झाले ते पाहून तर सगळेजण थक्क झाले.
शेतकरी जोड व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाची निर्मिती करत असतो तसेच अनेकदा गावांमध्ये पशुपालन देखील केले जाते. यामध्ये गाय, बकरी, मेंढी, कोंबडी या सर्वांचा समावेश केला जातो. या सर्वांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे देखील मिळत असतात. आज ही खेडेगावांमध्ये दुग्ध व्यवसाय महत्त्वाचा मानला जातो.
तरुणांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लवकरच बंपर भरती, 16838 जागांसाठी करता येईल अर्ज
दोन संख्या भावांनी गायींना चक्क ताक पाजून दुधाचे उत्पादनास वाढ केलेली आहे. हा प्रयोग पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भोंडणी येथे करण्यात आलेला आहे. या गावातील दोन भावांनी हा प्रयोग केला आणि या प्रयोगात त्यांना यश देखील मिळाले.
हे दोघे भाऊ उच्चशिक्षित आहे. त्यांनी एमबीए डिग्री मिळवल्यानंतर विदेशी बँकेत त्यांनी काही काम केले परंतु या बँकेतून त्यांनी राजीनामा देऊन पुढील आयुष्य शेतीसाठी वेचले. या दोन्ही भावांचे नाव आहे सत्यजित हांगे आणि अजिंक्य हांगे. या दोघांनी अगदी पारंपारिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीच्या काळात कोणत्याही प्रकारचा रासायनिक खतांनी औषधी न वापरता त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. सध्या या दोन्ही भावांकडे शंभर देशी गाई आहेत. या गाईंपासून हजारो लिटर दूध देखील यांना मिळते. या गाईंच्या मदतीने त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.
दुधापासून तूप बनवले जाते त्याचबरोबर ताक देखील बनवले जाते. यात ताकाचा उपयोग त्यांनी गाईसाठी केला. उरलेले ताक गाईला पाजल्यामुळे चाऱ्याचा अतिरिक्त खर्च वाचला, त्याचबरोबर ताक नेहमी पणे गाईंना पाजल्याने दुधाच्या निर्मितीमध्ये जास्त वाढ देखील झाली. हा प्रयोग त्यांनी यशस्वीरित्या पार पाडला. या प्रयोगामुळे त्यांच्या उत्पादनामध्ये देखील वाढ झाली.
गाईपासून मिळणाऱ्या अनेक उत्पादनाच्या मदतीने त्यांनी आपले जीवन उज्वल केले. आजच्या क्षणाला 26 कोटी पेक्षा जास्त वार्षिक उलाढाल हे दोघे भावंडे करत आहेत तसेच यांचे निमितपणे अनेक ग्राहक देखील आहेत. आज पंचक्रोशी मध्ये यांचे नाव देखील काढले जाते.