आयटीआय म्युच्युअल फंडातर्फे आयटीआय फोकस्ड इक्विटी फंडाच्या एनएफओचा शुभारंभ

38

पुणे : आयटीआय म्युच्युअल फंडाने आयटीआय फोकस्ड इक्विटी फंड हा एनएफओ गुंतवणूकदारांसाठी आणत असल्याची घोषणा केली आहे आणि हा एनएफओ गुंतणकीसाठी आज उघडेल आणि येत्या १२ जून २०२३ रोजी बंद होणार आहेआयटीआय फोकस्ड इक्विटी फंड हा प्रामुख्याने ३० कंपन्यांच्या भांडवली बाजारमूल्यात गुंतवणूक करणारा अत्यंत केंद्रित असा पोर्टफोलिओ असणार आहेया फंडात किमान पाच हजार रुपये आणि त्यानंतर एक रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईलया फंडाचे व्यवस्थापन धीमंत शहा आणि रोहन कोरडे हे संयुक्तरित्या सांभाळणार आहेतआयटीआय फोकस्ड इक्विटी फंडासाठी निफ्टी  ५०० टोटल रिटर्न हा पायाभूत निर्देशांक राहणार आहे.

 विविध भांडवली बाजारमूल्य असलेल्या तीस कंपन्याच्या समभाग आणि समभागांशी संबंधित तत्सम साधनांमध्ये हा फंड प्रामुख्याने गुंतवणूक करणार आहेदीर्घकाळ गुंतवणूकीचा दृष्टीकोन असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा एनएफओ सुयोग्य आहे.

एनएफओच्या शभारंभाची घोषणा करताना आटीआय म्युच्यूअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी राजेश भाटिया म्हणाले, आमच्या गुंतवणूकदाराच्या जोखीम क्षमतेनुरूप बाजारात नवनवीन गुंतवणूक साधने आणणे हे एक फंड घराणे म्हणून आमचा सतत प्रयत्न राहिलेला आहेआयटीआय फोकस्ड इक्विटी फंड हा प्रामुख्याने केंद्रीत पोर्टफोलिओ असून आमच्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत विविध क्षेत्रातील वाढीचे घटक आणि वाढीचे शिलेदार यांचे फायदे मिळवून देण्याची आमची मनिषा आहेउत्तम कामगिरीची परंपरा आणि गुंतवणूकीच्या भरभक्कम तत्वज्ञानाच्या आधारावर चालणाऱ्या आयटीआय म्युच्यूअल फंडाने विविध प्रकारच्या जोखीमक्षमता असलेल्या सर्व गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूकीचे पर्याय देण्यावर लक्ष केंद्रीत केलेले आहे.

 चार वर्षांच्या कालावधीतआयटीआय म्युच्युअल फंडाने १७ योजना सुरू केल्या आहेत आणि गुंतवणूकदारांना सर्वोत्तम गुंतवणुक अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहेआयटीआय म्युच्युअल फंडाचे देशात ५७ हून अधिक ठिकाणी (त्यांच्या शाखा/आयटीआय समूह कार्यालयांसहकेंद्र आहेत  आणि भारतभर२१हजार २०९ वितरकांचे जाळे कार्यरत आहे.