ऐन सुट्टीत पुण्यातील पर्यटकांच्या आनंदावर पडणार विरजन, खडकवासला चौपाटी, सिंहगड किल्ला राहील बंद; जाणून घ्या कारण..

48
खडकवासला-चौपाटी-प्रवेश-बंद

हल्ली उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येक जण बाहेर जाण्याचे प्लॅनिंग देखील करत असतो. आज सुट्टी मध्ये पुण्यातील पर्यटकांच्या आनंदावर विरजन देखील पडणार आहे.

रविवारच्या सुट्टीत सिंहगडाकडे जाणाऱ्या पुणे शहरातील नागरिकांना आता भविष्यात रस्ता बदली करावा लागणार आहे, कारण की या दिशेने जाणारा रस्ता नो एन्ट्री म्हणून घोषित केला गेला आहे. सिंहगड आणि खडकवासला चौपाटी पुढील दोन दिवस पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.

पुणे शहरामध्ये असे अनेक पर्यटन स्थळ आहेत. ज्या पर्यटन स्थळावर लोकांची अफाट गर्दी असते, त्यापैकी एक म्हणजे सिंहगड किल्ला आणि खडकवासला चौपाटी. या दोन्ही स्थळांवर उन्हाळ्याच्या दिवसात तसेच बाकीच्या अन्य दिवसात देखील पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

शनिवार आणि रविवार या दिवशी अनेक जण सुट्टीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात परंतु रविवारी या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी करण्यात येणार आहे, कारण की हा भाग पर्यटकांसाठी नो एंट्री म्हणून घोषित केला गेला आहे. सिंहगड आणि खडकवासला या दोन्ही ठिकाणी बंदी करण्याचे कारण नेमके वेगळेच आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच खडकवासला चौपाटी व सिंहगड किल्ला हा पर्यटकांसाठी व अन्य सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आलेल्या खडकवासला धरणाच्या बाजूलाच असलेले उन्नत प्राद्योगिक संरक्षण संस्था म्हणजेच डी आय टी येथे संरक्षण मंत्री राजनाथसिंह येणार आहेत.

परंतु विकेंड साजरा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या आनंदावर मात्र विरजण पडणार आहे. पर्यटकांना आपले पर्यटन स्थळ दोन दिवसासाठी बदलावे लागणार आहे. पर्यटकांची जास्त प्रमाणात गर्दी झाल्याने देखील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाहायला मिळते.

या ठिकाणी बंदी ही फक्त आपल्याला दोन दिवसच पाहायला मिळणार आहे. हि बंदी दुपारी दोन वाजेपर्यंत राहील. संरक्षण मंत्री यांच्या दौऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये या अनुषंगाने ही बंदी ठेवण्यात आलेली आहे , परंतु कोणतीही पूर्वकल्पना न देता ही बंदी ठेवल्याने पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागणार आहे तसेच त्यांची गैरसोय देखील होणार आहे असा सूर पर्यटकांकडून व्यक्त केला जात आहे.