गेल्या 48 वर्षापासून एकही खड्डा न पडलेला जंगली महाराज रस्त्याचे केले जाईल खोदकाम, कारण जाणून तुम्ही व्यक्त कराल हळहळ!

54

पुणे शहरास ऐतिहासिक शहर म्हटले जाते. आजही पुणे विद्याचे माहेरघर संस्कृतीचे माहेरघर मानले जाते. पुण्यामध्ये अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याचा ठेवा वाटायला हवा. पुण्यामध्ये असे देखील काही रस्ते आहेत ज्यांचे खोदकाम गेल्या अनेक वर्षांपासून केले नाहीत, त्यापैकी एक रस्ता म्हणजे जंगली महाराज रस्ता. परंतु या रस्त्याचे देखील आता खोदकाम करणार आहे यामागचे कारण देखील वेगळेच आहेत..

पुण्यामध्ये 14 ऑक्टोबर 2022 रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली. बघता बघता डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर भीषण पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. एकेकाळी पुणे ही स्मार्ट सिटी अंतर्गत असून देखील पूर जन्य परिस्थिती निर्माण झाल्याने लोकांचा संताप झाला आणि महानगरपालिकेला लोकांच्या संतापाला सामोरे जावे लागले म्हणूनच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता पुणे महानगरपालिकेने पावसाळी पूर्वीच काही महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे.

पावसाळी गटारांची क्षमता वाढावी याकरिता महानगरपालिकेतील मल निस्सरण विभागाने 5 कोटी रुपयांचा आराखडा देखील तयार केलेला आहे. जंगली महाराज रस्त्यावर खोदकाम करण्यात येणार आहे तसेच दोन्ही बाजूला चेंबर तसेच बनवून योग्य ते नियोजन देखील केले जाणार आहे 48 वर्षातून एकदाही या रस्त्यावर खोद काम न झालेल्या गोष्टी आता येथे पाहायला मिळणार आहेत.

थोडा जरी पाऊस या रस्त्यावर पडला तरी या भागामध्ये पाणी साचण्याचे प्रमाण वाढते, त्यामध्ये कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. बालगंधर्व मंदिर संभाजी उद्यान, डेक्कन जिमखाना या ठिकाणी मेट्रोचे काम करत असताना पावसाळी गटार तुटलेले आहेत. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी वाहून येण्याची क्षमता कमी झाली त्याचबरोबर पावसाळी गटारावर सिमेंट, फायबर जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत यामुळे देखील पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणावर होत नाही.

पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून एकही खड्डा न पडलेल्या रस्त्यावर आता मात्र खड्डे करण्याची वेळ येणार आहे. नव्या आराखड्यानुसार योग्य ते नियोजन करून पाणी वाहण्यासाठी वेगवेगळ्या शकली देखील लढवणार आहे तसेच चेंबरची संख्या वाढून ३ बाय ३ चे चेंबर विविध ठिकाणी बांधून पाणी निचरा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

हे हि वाचा : सत्यनारायण पूजेला गौतमी पाटील ची उपस्थिती, आयोजकांची झाली पंचाईत; सर्व स्तरातून होते टीका!