आज दुपारी 2 वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल, असा पाहता येईल निकाल

145
nikal

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी (२५ मे) दुपारी २ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य बोर्डाकडून देण्यात आली.

अन्य शिक्षण मंडळांचे बारावीचे निकाल यापूर्वीच जाहीर झाले. राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी, मार्च २०२३ दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा राज्यातील नऊ विभागीय मंडळांच्या मार्फत घेण्यात आली होती.

पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि कोकण अशा नऊ विभागात राज्यभरातून १२ लाखांवर विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण संकेतस्थळांवर उपलब्ध होतील.

तसेच त्यांची प्रिंट घेता येईल.

या संकेतस्थळावर निकाल

mahresult.nic.in

https://hsc.mahresults.org.in

https://hscresult.mkcl.org

https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board

https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023

http://mh12.abpmajha.com