आपल्या सर्वांना माहिती आहे की, एखाद्या व्यक्तीने जर वाहतुकीचे नियम मोडले असतील तर पोलीस व्यक्तीकडून दंड आकारतात तसेच आवश्यक प्रक्रिया पार पाडतात.
काल मुंबई सत्र न्यायालयाने वाहतूक पोलिसांविरुद्ध एक निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे वाहतूक पोलिसांची गोची झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. पोलिसांची कार्यपद्धती अत्यंत चुकीची आहे तसेच पोलीस चुकीच्या पद्धतीने वाहन चालकांशी वर्तन करत असतात, असा शिक्का देखील सत्र न्यायालयाने दिला.
आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असेल की जेव्हा एखादा व्यक्ती वाहतुकीचे नियम मोडतो तेव्हा पोलीस अधिकारी त्या व्यक्तीच्या गाडीची चावी काढून घेतात परंतु असे करणे योग्य आहे का? असे कृत्य करण्याचा वाहतूक पोलिसांना अधिकार आहे का? तर आम्ही तुमच्यासाठी सांगू इच्छितो की, असा कोणताही अधिकार वाहतूक पोलिसांना नाही, याची खुद्द माहिती मुंबई सत्र न्यायालयाने दिली.
व्यक्तीने वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर दंड भरला असेल तर अशावेळी पोलीस ठाण्यामध्ये देखील जाण्याची गरज नाही. काल झालेल्या एका सुनावणी मध्ये न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे.
वाहतुकीचे नियम मोडून शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण करण्याचा आरोप पोलिसांनी एका व्यक्तीवर केला होता तसेच त्याला अटक देखील करण्यात आले होते परंतु तरुणांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतल्यानंतर सबळ पुराव्याच्या अभावी त्या व्यक्तीला निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
कुलाबा परिसरामध्ये एका सिग्नल वर एक तरुण विना हेल्मेट दुचाकी चालत होता, यावेळी पोलिसांनी नियम मोडला म्हणून त्याच्याकडून दंड वसूल केला. सुरुवातीला या तरुणाने विरोध केला परंतु पोलिसानी कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
नियम मोडल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली याच प्रकरणी मुंबई न्यायालयाने एक निकाल जाहीर केलेला आहे तसेच भविष्यात दुचाकी चालक दंड भरत असेल तर त्याला पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाण्याची सक्ती करू नये तसेच यापुढे पोलिसांना दुचाकी वाहकाची गाडीची चावी काढून घेण्याचा देखील अधिकार नाही असे खडसावून सांगितले.