तुमचे आधार कार्ड अजूनही अपडेट केले नसेल तर करून घ्या अपडेट, शेवटची संधी नाही तर मोजावे लागतील शंभर रुपये पेक्षा जास्त पैसे !

79

आपल्या सर्वांना आधार कार्ड माहितीच आहे. आधार कार्ड एक महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानले जाते. हल्ली केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याचे कार्य हाती घेतलेले आहे ,यामुळे जर तुम्ही देखील आधार कार्ड अपडेट केले नसेल तर लवकरच करून घ्या. तुमच्या आधार कार्ड मध्ये तुमचे नाव, तुमचा पत्ता, फोटो, कोड, तुमची ओळख माहिती इत्यादी गोष्टी सामावलेल्या असतात आणि म्हणूनच अशा वेळी माहिती अपडेट असणे अत्यंत गरजेचे आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ए आय डी आय ए म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी लोकांकरिता मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

तुम्ही तुमचे आधार कार्ड घरबसल्या देखील अपडेट करू शकता, याकरिता तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच माय आधार वर जायचे आहे आणि कार्ड मधील माहिती अपडेट करायचे आहे. तुम्हाला एक जून पर्यंत आधार कार्ड अपडेट करण्याची संधी मिळणार आहे, त्यानंतर तुम्हाला शंभर रुपये पेक्षा जास्त शुल्क देखील दंड म्हणून लागेल.

तुम्ही जर तुमच्या आधार कार्ड ऑनलाइन पोर्टरच्या मदतीने अपडेट करत असाल तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे लागणार नाही परंतु जर तुम्ही ऑफलाइन म्हणजेच आधार सेंटरवर जाऊन तुमच्या आधार कार्ड अपडेट करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये प्रत्येकी कार्ड इतके पैसे भरावे लागेल.

आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला पुढील पायऱ्यांचा वापर करावा लागेल.

सर्वप्रथम माय आधार या वेबसाईटवर तुम्हाला जावे लागेल. https://myaadhaar.uidai.gov.in/ या लिंक वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर व ओटीपी समाविष्ट करावा लागेल.

डॉक्युमेंट स्कॅन अपडेट पर्याय निवडून तुम्हाला आवश्यक ती माहिती भरावी लागेल.

ड्रॉप लिस्ट निवडून तुम्हाला तुमचे आयडी खूप व ॲड्रेस अपडेट करावे लागेल. यानंतर तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे असे केल्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळेल हा नंबर तुमचा आधार कार्ड अपडेट झाल्याची खात्री देतो.

रिक्वेस्ट नंबरच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमच्या आधार कार्ड अपडेट ची माहिती सहजरित्या मिळवू शकतात.

हे हि वाचा : गेल्या 48 वर्षापासून एकही खड्डा न पडलेला जंगली महाराज रस्त्याचे केले जाईल खोदकाम, कारण जाणून तुम्ही व्यक्त कराल हळहळ!