तुम्ही देखील दुकानदाराला मोबाईल नंबर देत असाल तर आत्ताच व्हा सावध, होऊ शकते फसवणूक? नवीन नियमावली झाली जाहीर !

197
online-fraud-alert-shopkeepers-cant-take-mobile-numbers-from-customers

शॉपिंग सेंटर येथे गेल्यावर दुकानदाराने मोबाईल नंबर मागितल्यावर सहजरीत्या त्याला मोबाईल नंबर सांगत असतो परंतु असे करणे हे भविष्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते.

केंद्र सरकारने ग्राहकांच्या गोपनेच्या अनुषंगाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, याचा तुम्हाला प्रामुख्याने उपयोग खरेदी करताना दिसून येणार आहे.

दैनंदिन जीवन जगत असताना आपल्यापैकी अनेक जण मॉलमध्ये किंवा मोठ्या दुकानांमध्ये अनेक सामानांची खरेदी करत असतो, अशावेळी बिल काऊंटर वर गेल्यावर आपल्याला मोबाईल नंबर विचारला जातो.

BIG BREAKING NEWS PUNE : पुण्यात वाजणार प्रचाराचे बिगुल? लवकरच लोकसभेची पोटनिवडणूक होईल जाहीर!…

आपण कोणत्याही प्रकारचा विचार न करता समोरच्या व्यक्तीला आपल्या मोबाईल नंबर सांगतो परंतु भविष्यात तुम्हाला असे जर दुकानदारांनी विचारले तर तुम्ही त्याला स्पष्टपणे नकार देऊ शकता, कारण की आता ही पद्धत बंद करण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने नवीन सूचना जारी केलेले आहेत, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी दिलेली आहे.

जय भविष्यात तुमच्याकडे विक्रेत्याने तुमचा मोबाईल नंबर मागितल्यास तुम्ही स्पष्टपणे नकार देऊ शकता. दुकानदाराने तुमचा मोबाईल नंबर मागणे हे अयोग्य व्यापार पद्धती अंतर्गत येते म्हणूनच ग्राहक संरक्षण कायदा नुसार अन्यायकारक आणि प्रतिबंधात्मक व्यवहार पद्धत अनुषंगाने तुम्ही दुकानदारास तुमचा मोबाईल नंबर देऊ शकणार नाही.

जर दुकानदाराने तुमच्याकडे मोबाईल नंबर साठी आग्रह केला तर तुम्ही त्याला स्पष्ट नकार देऊ शकता. जर मोबाईल नंबर मागण्याबाबत तुमच्यावर सक्ती करण्यात आली तर तुम्ही थेट ग्राहक संरक्षण न्यायालयात तक्रार करून थेट दाद मागू शकता.

अनेक दुकानांमध्ये एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर दुकानदार आपल्या मोबाईल नंबर मागतो. कॉम्प्युटरमध्ये ग्राहकाचा नंबर सेव्ह केला जातो.

अनेकदा ई-मेल आयडी देखील मागितले जातात व उत्पादना संबंधित अनेक माहिती तुम्हाला मेलवर दिली जाते. आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत माहिती देण्याचा आग्रह तुमच्याकडे केला जाणार नाही कारण की कोणती माहिती द्यायची आणि कोणती माहिती द्यायची नाही हा सर्वस्वी तुमचा कौल ठरणार आहे.

ग्राहक संरक्षण मंचाकडे अनेकदा दुकानदार वारंवार मोबाईल नंबर मागतात,अशी तक्रार देखील आलेली आहे म्हणूनच केंद्र सरकारने ही नवीन नियमावली जाहीर केलेली आहे तसेच आपल्यापैकी अनेक जण थेट गुगल स्कॅनर कोड चा वापर करत असतात अशावेळी हॅकर्स बनावट कोड निर्माण करून तुमची पर्सनल माहिती देखील हॅक करू शकता यामुळे भविष्यात ब्लॅकमेलिंगच्या घटना देखील घडू शकतात.

या सर्व गोष्टींना आळा बसावा याकरिता केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.