मुंबईच्या पावसात घर-दुकाने भविष्यात होणार नाहीत ओली, फक्त तीन रुपयांत मिळतेय ताडपत्री !

91
tadpatri

मुंबईच्या पावसात घर-दुकाने भविष्यात होणार नाहीत ओली, फक्त तीन रुपयांत मिळतेय ताडपत्री ! – पावसाळा काही दिवसांतच सुरू होईल. सगळीकडे पावसाळ्यापूर्वी कामे जोरात सुरू आहेत. आपल्यापैकी अनेकांनी घराची दुरुस्ती करायला सुरुवात देखील केली असेल. पावसाळ्याचे दिवस येताच मुंबईतील अनेक घरांवर ताडपत्री टाकण्याचे काम सुरू होते. ताडपत्रीमुळे घर आणि दुकान ओले होत नाही म्हणूनच ताडपत्री खरेदी करण्याचे वेध सगळ्यांना लागलेले असतात, अशात जर आपल्याला ताडपत्री अगदी स्वस्त मिळाली तर किती बरे होईल ना....

यंदा मोठ्या प्रमाणावर अनेकांना उकाडा जाणवला. वातावरणात उष्णता पसरलेली होती. काही ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झालेली आहे. मुंबईकरांना देखील पावसाचे वेध लागलेले आहेत. कधी एकदा पाऊस पडतो असे झालेले आहे परंतु यापूर्वी मुंबईकर घरांची दुरुस्ती करण्याच्या तयारीसाठी लागलेले आहेत. घर आणि दुकानांच्या पत्र्यांवर ताडपत्री टाकण्याचे काम देखील सुरू झालेले आहे म्हणूनच ताडपत्री विकत घेण्यासाठी मुंबईकरांची रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे.

ताडपत्री खरेदी करण्यासाठी मज्जिद बंदर अत्यंत महत्त्वाचे स्थान मानले जाते. या ठिकाणी तुम्हाला अगदी स्वस्तात ताडपत्री मिळेल. हि ताडपत्री स्वस्त तर असतेच त्याचबरोबर टिकाऊ देखील तितकीच असते.

या ताडपत्रीचा वापर करून तुम्ही पावसापासून संरक्षण मिळवू शकतात. अनेकदा घरांवर पारंपारिक मातीची कौले, टिन पत्रे तसेच प्लास्टिक ताडपत्रीचा वापर केला जातो परंतु गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांना आपल्या घरावर मातीची कौले टाकणे शक्य होत नाही, अशावेळी तुम्ही पावसापासून घराचे संरक्षण करण्यासाठी ताडपत्रीचा वापर सहज करू शकता. या ताडपत्रीचा वापर केल्याने घरांना गळती देखील लागत नाही.

tadpatri

मज्जिद बंदर मध्ये रंगबिरंगी ताडपत्री देखील आलेल्या आहेत. या ताडपत्री चा वापर करून तुम्ही तुमचे घर गळण्यापासून वाचवू शकता.

मुंबईतील मज्जिद बंदर येथे ताडपत्रीची अनेक दुकाने आहेत. तसेच येथे तुम्हाला व्यापारी देखील पाहायला मिळतील. त्यांच्याकडून तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये ताडपत्री विकत घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला तीन रुपये चौरस फुटा ने ताडपत्री विकत मिळेल.

मोहम्मद अली रोड येथे टी एन आय प्लास्टिक नावाचे दुकान आहे. या दुकानात वेगवेगळ्या रंगाच्या ताडपत्री मिळतात. तसेच होलसेल रिटेल मध्ये देखील व्यवसाय करतात, असे या दुकानाचे मालक तौहिद खान यांनी सांगितले.