पुणे : गनर्स आणि इंद्रायणी एफसी संघांनी तुल्यबळ संघाचा पराभव करून प्रथम श्रेणीच्या अॅस्पायर २०२३ चषक फुटबॉल स्पर्धेत सनसनाटी सुरुवात केली.
पिंपरी येथील डॉ. हेडगेवार मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेतील अन्य सामन्यात थंडरकॅटस आणि सांगवी एफसी ब संघांनी आपल्या मोहिमेस विजयी सुरुवात केली.
गनर्स एफसी संघाने विनीत कोड्रेने नवव्या मिनिटाला केलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर अव्वल श्रेणीतील संगम यंग बॉईज अ संघाचा १-० असा पराभव केला.
पाठोपाठ इंद्रायणी एस.सी संघाने दोन्ही सत्रात एकेक गोल करताना घोरपडी तमिळ युनायटेड संघाचे आव्हान २-० असे संपुष्टात आणले. इंद्रायणीकडून दोन्ही गोल जगत राजने अनुक्रमे २५ आणि ५०व्या मिनिटाला केले.
तिसऱ्या सामन्यात थंडरकॅटस संघाने हृषिकेश कारळेने २७व्या मिनिटाला नोंदवलेल्या गोलच्या जोरावर स्निग्मय पुणे एफसी संघाचा १-० असा पराभव केला.
सांगवी एफसी अ संघाने रुपाली एससी संघावर ४-२ असा शूट-आऊटमध्ये विजय मिळविला. नियोजित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता. शूट आऊटमध्ये विजयी संघाकडून धीरक नायर, हरी बिगाला, वैभव पाटील, सुबोध लामा यांनी जाळीचा यशस्वी वेध घेतला. पराभूत संघाच्या अनुराग पवार आणि शुभम पोटघनलाच गोल करण्यात यश आले.
निकाल – (अव्वल श्रेणी)
सांगवी एफसी अ ० (४) (धीरज नायर, हरि बिगाला, वैभव पाटील, सुबोध लामा) वि.वि. रुपाली एफसी ० (२) ( अनुराग पवार, शुभम पोटघन)
गनर्स एफसी १ (विनित कोड्रे ९वे मिनिट) वि.वि. संगम यंग बॉईज ०
इंद्रायणी एससी २ (जगत राज २५ आणि ५०वे मिनिट) वि.वि. घोरपडी तमिळ युनायटेड ०
थंडरकॅटस एफसी १ (हृषिकेश कारळे २७वे मिनिट) वि.वि. स्निग्मय एफसी ०