तरुणांसाठी सर्वात मोठी खूशखबर! इंडियन नेव्हीमध्ये तब्बल 372 जागांसाठी भरतीची घोषणा; अर्जाला झाली सुरुवात

357

सरकारी नोकरी लागावी, यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. कारण सरकारी नोकरी एकदा लागली की, आयुष्यभराचं टेन्शन जातं, असाच आजही बहुतांश जणांचा समज आहे. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेकांचे सतत प्रयत्न सुरू असतात.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या व त्यातही भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलानं चार्जमन-II च्या 372 रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

आज, सोमवार (15 मे 2023) पासून हे अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 29 मे 2023 आहे. इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाच्या https://www.joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय.

असा करा अर्ज

joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

– Join navy चा पर्याय होम पेजवर दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर Civilian व नंतर chargeman-II वर क्लिक करा.

– ऑनलाइन अर्ज भरा.

– सर्व आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.

– अर्ज फी भरा.

– भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

किती असावं वय?

चार्जमन-II च्या 372 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचं वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावं.

पात्रता काय?

भारतीय नौदलाच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी एखाद्या मान्यताप्राप्त महाविद्यालयांतून फिजिक्स, केमिस्ट्री, गणित विषयासह सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलेलं असावं, किंवा उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून योग्य विषयातील पदवी धारण केलेली असावी.

शुल्क किती आहे?

भारतीय नौदल भरतीसाठी अर्ज करताना शुल्क 278 रुपये एवढे आहे. मात्र, सर्व महिला, एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, ईएसएम उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

दरम्यान, ही भरती प्रक्रिया म्हणजे भारतीय नौदलात भरती होण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत ही 29 मे 2023 पर्यंत आहे. परंतु अर्ज करण्याची मुदत संपण्यासाठी अजून जवळपास 15 दिवसांचा अवधी असला तरी ऐनवेळी धावपळ होऊ नये, यासाठी आताच अर्ज करून या भरती प्रक्रियेत सहभागी होणं फायद्याचं ठरू शकतं. या पदावर भरती झाल्यानंतर चांगला पगार, विविध सोयीसुविधा यादेखील उमेदवाराला मिळतील.