पुणेकरांसाठी खुशखबर…आता २४ तास मिळणार पाणी?

68
pune water

पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे परंतु एकीकडे पाणी जरी आपले जीवन असले तरी पाणी हे उपलब्ध होणे देखील तितकेच गरजेचे आहे.

दुसरीकडे लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, अशावेळी शहरीकरणाची वाढ झाल्याने शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी 24 तास पाणी उपलब्ध करून देणे अनेकदा समस्या निर्माण झालेली आहे, यावेळी नेमके काय करता येईल याचे नियोजन करणे देखील गरजेचे आहे.

पुणे शहर म्हटले की, आपल्याला डोळ्यांसमोर उद्योग धंदे, आयटी कंपनी दिसून येतात. एकीकडे पुणे शहरांमध्ये लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

वाढती लोकसंख्या याचा विचार करता या शहराला लागणारे पाणी हा देखील समस्येचा विषय झालेला आहे. एकेकाळी पुणे शहरांमध्ये 24 तास पाणी उपलब्ध असायचे परंतु कालांतराने आता पाणी एका दिवसात सोडले जात आहे. पुन्हा पुणेकरांना 24 तास पाणी मिळणार का? असा देखील प्रश्न शहरातील नागरिक करत आहेत.

हेही नक्की वाचा : GAUTAMI PATIL : महाराष्ट्रातले गौतमी पाटील हिचे कार्यक्रम बंद होणार? जाणून घ्या कुणी दिला हा इशारा?

2019 पासून पुणे शहरांमध्ये एका दिवसाआड पाणी सोडले जाऊ लागले आणि पुणेकरांच्या पाण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या.

2019 पूर्वी पुणे शहरातील लोकांना रोज म्हणजे 24 तास पाणी उपलब्ध असायचे परंतु वाढते उद्योगधंदे, नोकरी, लोकसंख्याचे प्रमाण शहरांमध्ये येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या या सर्वांचा विचार करता शहरातील नागरिकांना पाणी पूरायला हवे या अनुषंगाने पाणी कपात करण्यात येऊ लागली.

आजच्या घडीला पुणे शहराचा विचार करायचा झाल्यास पुणे शहरात तीस लाखापेक्षा जास्त लोक राहत आहेत. आज पुण्यामध्ये भक्कम पायाभूत असलेल्या सुविधा आपल्याला पाहायला मिळत आहेत.

पुण्याची ओळख देखील आता बदललेली आहे. सांस्कृतिक शहर मानले जाणारे पुणे आज जगातील उद्योगधंदे व आयटी कंपन्यांचे माहेरघर देखील समजले जात आहे.

1985 पासून पुणे शहराला मावळातील पावणा धरणातून पाणी पुरवले जात होते. हळूहळू पुणे शहराच्या आजूबाजूला गावांची संख्या वाढतच गेली कालांतराने एकेकाळी 24 तास उपलब्ध असणारे पाणी पुणेकरांच्या नशिबातून हळूहळू कमी होऊ लागले. आजही पुणेकरांच्या सेवेला लाखो लिटर पाणी धरणातून पुणेकरांसाठी सोडले जाते.

पुणे शहरातील नागरिकांना 24 तास पाणी उपलब्ध व्हावे या अनुषंगाने महानगरपालिका कडून योग्य ते पाऊल देखील उचलले जात आहे.

भामा आसखेड धरणातून 167 एम एल डी पाणी आणण्यासाठी पुणे महानगरपालिका शर्तीचे प्रयत्न देखील चालू आहे तसेच पाईपलाईन टाकण्याचे काम देखील सुरू करण्यात आलेले आहे.

पाईपलाईन टाकण्याचे काम इंदोरी या ठिकाणापर्यंत सुरू झालेले आहे, परंतु पुढील जागा ताब्यात घेण्याचे काम चालू आहे या संदर्भातील चर्चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील केली जात आहे.

लवकरच एक समिती स्थापन केली जाईल आणि सर्व काम युद्ध पातळीवर केले जातील अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली म्हणूनच पुणेकरांना लवकरच 24 तास पाणी उपलब्ध होईल अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे.