पदवीधरकांसाठी सुवर्णसंधी! पुणे महानगरपालिकेमध्ये बंपर भरती; अशा प्रकारे करा अर्ज!

43
PMC-Recruitment

हल्ली बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. प्रत्येक जण स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर अनेकदा परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी प्राप्त होत नाही.

जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधामध्ये असाल आणि पदवीधर असाल तर आता चिंता करू नका. पुणे महानगरपालिकेमध्ये बंपर भरती निघाली आहे आणि ही भरती पूर्णतः पदवीधर धारकांसाठी आहे.

पुणे महानगरपालिकेने तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आणलेली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, यासाठी शैक्षणिक पात्रता व उमेदवारांकडून मर्यादित कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने असतील.

हेही वाचा : जुलैपासून बदलणार ‘हे’ नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम! जाणून घ्या सविस्तर माहिती…

पुणे महानगरपालिकेमध्ये तरुणांसाठी जॉबची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पुणे महानगरपालिकेने एकूण 06 पदाकरिता ही भरती काढलेली आहे.

या भरतीमध्ये पुणे महानगरपालिका प्रशासनाने लिपिक कम डेटा एन्ट्री ऑपरेटर याकरिता एकूण 06 जागांसाठी भरती काढलेली आहे तसेच या पदाकरिता उमेदवाराने पदवी शिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे तसेच हा उमेदवार उत्तीर्ण असायला हवा. या उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या उमेदवाराने शासनमान्य टायपिंग संस्थेमधून मराठी 40 प्रतिमिनिट व इंग्रजी 30 प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराचे वय कमीत कमीत 18 वर्ष असणे गरजेचे आहे तर जास्तीत जास्त 38 वर्ष असावे. मागासवर्गीय उमेदवारी करता पाच वर्षे सुट देखील देण्यात आलेली आहे.

उमेदवारांना नोकरी लागल्यानंतर पगार देखील तितकाच चांगला मिळणार आहे. या उमेदवारांना 21 हजार 525 प्रति महिना पगार मिळेल.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे. हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेय वैद्यकीय महाविद्यालय , ठाकरे चौक मंगळवार पेठ पुणे.

अर्जदारांना 30 जून 2023 पर्यंत अर्ज पाठवायचे आहे. सदर महानगरपालिकेच्या पदभरतीसाठी आवेदन शुल्क आकारले जाणार नाही याची देखील उमेदवाराने नोंद घ्यावी म्हणूनच जास्तीत जास्त तरुणांनी या पदाचा लाभ घ्यावा व या भरतीसाठी अर्ज जमा करावे, असे महानगरपालिकेद्वारे आवाहन करण्यात आले आहे.