घाण पाणी पुणे शहराचे त्रास मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना; मांजरी बाजारात घाण पाणी शिरले

498

याच पाण्याने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त व बाजार समितीचे गरड यांना आंघोळ घालणार – बालवडकर

लोणी काळभोर प्रतिनिधी- कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांचा मांजरी येथील कै. अण्णासाहेब मगर उप बाजारात असुन बेबी कँनलचे घाण पाणी शिरल्यामुळे बाजारात घाण पाणी दिसत होते.

नदीतून घाण पाणी उचलून ते साडेसतराने येथून बेबी कँनलमधून मधून सोडले जाते. त्या कॅनल खालून साडे सतरा नळी येथील अन्सारी फाटा ते शेवाळेवाडी उपबाजाराच्या जवळुन ब्रिटिश कालीन ड्रेनेज लाईन गेली असून बेबी कॅनल दुरुस्तीच्या वेळेस ती ड्रेनेज लाईन फुटली त्यावेळी पुणे महानगरपालिकेने तेथे एक चेंबर टाकून दिला.

ड्रेनेज लाईनचे काम केले परंतु बेबी कॅनल मधून आलेल्या पाण्यामुळे तो चेंबर वाहून गेला व बेबी कॅनल चे घाण पाणी त्या लाईन मधून बाजाराच्या आवारात येत असून त्यामुळे सर्वत्र बाजारात दुर्गंधी सुटली आहे व शेतकऱ्यांच्या आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

या घाण पाण्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल नेण्यास असमर्थता दाखवल्यामुळे शेतीमालाचे बाजार भाव पडून शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मांजरी उप बाजार प्रमुख विजय घुले यांनी सांगितले की पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयात वेळोवेळी पत्रव्यवहार करून व मी स्वतः सांगून हे अधिकारी ऐकत नसून त्यामुळे गेले पंधरा दिवस सतत पाणी येत आहे.

सर्व सर्वत्र पत्र व्यवहार केला तरी त्या पत्र व्यवहाराला पुणे महानगरपालिकेचे अधिकारी केराची टोपली दाखवत आहेत. त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न मांजरी बाजारात निर्माण झाला असून तो त्वरित सोडवावा असे घुले यांनी सांगितले.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख सूर्यकांत काळभोर यांनी सांगितले की दोन दिवसात जर हा प्रश्न मिटला नाही तर आम्ही आत्मदहन करणार आहोत.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की जर हा प्रश्न दोन दिवसात सुटला नाही तर आयुक्त कार्यालयात आयुक्तांना व गरड यांना आंघोळ घालण्यात येईल.

हा प्रश्न ताबडतोब सोडवुन शेतकऱ्यांची होणारी कुचंबणा थांबवावी असे बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले.

More News

BIG NEWS : खंडणीसाठी पुण्यात तिघांचं अपहरण, धागेदोरे नगरमधील सरपंचापर्यंत…