गौतमी पाटीलच्या आईचा फोटो सोशल मीडियावर झाला वायरल, फोटो पाहून चाहते म्हणाले…

82

गौतमी पाटील हे नाव दिवसेंदिवस चर्चेमध्ये येतच आहे. रोज काही ना काही आपल्याला गौतमीबद्दल नवीन माहिती मिळत आहे. गौतमीच्या वडिलांचा एक व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी आपल्या सर्वांच्या समोर आला आणि आपली मुलगी जे करते आहे, ते योग्यच आहे, असा संदेश देखील त्या व्हिडिओमध्ये देण्यात आला होता.

या व्हिडिओमध्ये गौतमी पाटीलच्या वडिलांनी मी गौतमी आणि तिच्या आईला सोडले नाही, असे देखील सांगितले. गौतमी पाटील चे कुटुंब, आडनाव सध्या खूपच चर्चेमध्ये आहे तसेच गौतमीच्या लहानपणीचे फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहेत.

गौतमीच्या आईचा फोटो सोशल मीडियावर येताच अनेकांनी गौतमी ही तिच्या आईसारखे दिसते, अश्या प्रकारच्या कमेंट देखील केलेल्या आहेत. गौतमीच्या आईचा फोटो पहिल्यांदाच सर्वांसमोर आलेला आहे म्हणूनच आता गौतमी पाटील व तिचे कुटुंब पुन्हा चर्चेचे विषय बनलेले आहेत.

गौतमीच्या आईचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला आहे. हा फोटो @Official_Gautami941 या अकाउंट वर अपलोड देखील करण्यात आलेला आहे. हे अकाउंट गौतमी पाटील चे अधिकृत अकाउंट आहे असे देखील म्हटले जाते परंतु या अकाउंटला अद्यापही ब्लू टिक मिळालेली नाहीये. या अकाउंट वर आठ लाखापेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. या अकाउंट वरून गौतमी पाटीलच्या आईचा जो फोटो शेअर करण्यात आलेला आहे, त्यावर “माझं जग मी आणि माझी आई” असे कॅप्शन लिहिण्यात आलेले आहे.

गौतमी पाटील च्या आईचा फोटो समोर येताच अनेकांनी कौतुक केले. काहींनी या फोटोवर टीका देखील केलेली आहे. एका युजरने असे देखील म्हटले आहे की, तू तुझ्या आई-वडिलांचा म्हातारपणी सांभाळ करायला हवा.. एक वेळ तू आम्हाला शिव्या दिल्या तर चालतील परंतु त्यांना दूर करू नको.. अशा प्रकारच्या विविध कमेंट्स या फोटोवर पाहायला मिळत आहे.