फक्त इतकी शिकलेली आहे गौतमी पाटील, शिक्षणा मुळे पुन्हा आली चर्चेत!

60

गौतमी पाटील या नावाची चर्चा काही थांबायचे नाव घेत नाहीये. रोज काही ना काही गौतमी पाटील संबंधित बातम्या, माहिती आपल्याला ऐकायला पाहायला मिळत आहेत. अलीकडेच गौतमी ने एक मुलाखत माध्यमांना दिली. या मुलाखतीत गौतमीने आपल्या शिक्षणाबद्दल सांगितले आहे तेव्हापासून तिथे शिक्षण आणि गौतमी पुन्हा चर्चेचा विषय माध्यमांसमोर बनलेली आहे.

गौतमी पाटील ने आतापर्यंत आपल्या नृत्याच्या माध्यमातून लोकांच्या हृदयावर राज्य केलेले आहेत. “पाटलांचा बैल गाडा”, “सरकार तुम्ही केलाय मार्केट जाम” अशा कितीतरी गाण्यांवर गौतमीने सादरीकरण केलेले आहे. आपल्या बहारदार त्यामुळे नेहमी गौतमी प्रेक्षकांचे मन आपल्याकडे आकर्षित करून घेते. तिच्या कार्यक्रमाला लोकांची अफाट गर्दी असते. गेल्या अनेक दिवसांपासून गौतम पाटील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असलेले देखील पाहायला मिळते. तिच्या नावाची चर्चा अनेकदा घडतच असते. एका गाण्यासाठी चांगले मानधन घेणारी गौतमी पाटील तिच्या लग्नाच्या चर्चेमुळे देखील माध्यमांच्या समोर आली होती. तिला भविष्यात कसा जोडीदार हवा तसेच तिचे शिक्षण या संबंधित अनेक गोष्टी तिने माध्यमां समोर व्यक्त केल्या.

गौतमी ही मुळची खानदेश मध्ये धुळे शहरातील आहे. गौतमीचे वय अवघे 27 वर्षे आहे. आतापर्यंत आपल्या आयुष्यात खूपच संघर्ष केलेला आहे. तिच्या आईने तिचा एकटीने सांभाळ केलेला आहे. घरची परिस्थिती चांगली नसताना देखील तिने परिस्थितीवर मात करून आज आपले नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेले आहे. परिस्थिती बेताची असल्याने गौतमीने फक्त दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले त्या पुढचे शिक्षण तिला पूर्ण करता आले नाही.

दहावीपर्यंत शिक्षण झाले असून देखील आज गौतमी आपल्या एका परफॉर्मन्ससाठी लाखो रुपये मानधन घेते, इतकेच नाही तर ती आयफोन देखील वापरत आहे आणि एक लक्झरी लाईफस्टाइल जगत आहे. गौतमी पाटील दिल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत असले तरी तिने नृत्याचे धडे कोणाकडूनही घेतले नाही. लवकरच घुंगरू या मराठी सिनेमांमध्ये गौतमी पाटील पाहायला मिळणार आहे.

हे हि वाचा : चक्क पडलेला मोबाईल मिळवण्यासाठी धरणातील 21 लाख पाणी घातले वाया, सरकारी अधिकाऱ्याची केली उचल बांगडी !