गौतमी पाटीलची घनश्याम दरोडेला गुगली; म्हणाली, की मी इतकंच म्हणेन…

50

गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या नावाची चर्चा ऐकायला मिळत आहे. वेगवेगळ्या माध्यम समूहांवर देखील गौतमी पाटील ची चर्चा पाहायला मिळत आहे.

गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे प्रसिद्ध झालेली आहे, त्याचबरोबर वादामध्ये देखील सापडलेले आहे. नृत्य क्षेत्रातील अनेकांनी देखील तिच्यावर टीका केली. रोज काहीना काही गौतमी पाटील वर टीका केली जात आहे.

अनेक जण आरोप प्रत्यारोप देखील केले करत आहेत. या सर्वांना गौतमी पाटील मात्र अगदी धीराने सामोरे जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मराठा संघ, गौतमी पाटील, तिचा नृत्य, तिचे हावभाव या सर्वां गोष्टीवर टीका केली जात आहे परंतु आता घनश्याम दरोडे यांनी देखील गौतमी पाटीवर टीका केलेली आहे.

पुण्यातल्या हिंजवडीच्या चौकातील तो प्रयोग यशस्वी, कसा होणार फायदा वाचा

घनश्याम दरोडे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. अनेक व्हिडिओ बनवून घनश्याम सोशल मीडियावर सक्रिय असतात. घनश्याम त्यांच्या वकृत्व शैलीमुळे देखील लोकांच्या मनात त्यांनी स्थान निर्माण केले आहे परंतु त्यांनी देखील आता गौतमी पाटीलच्या वादामध्ये उडी घेतलेली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून गौतमी पाटील तिच्या डान्स मुळे अनेकदा वादामध्ये सापडलेली आपल्याला पाहायला मिळते, त्यानंतर तिचे आडनाव पाटील असल्याने देखील तिच्यावर ताशेरे ओढण्यात आले.

तुम्हा सर्वांना छोट्या पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या घनश्याम माहिती आहे. याने देखील गौतमी पाटील ला एक इशारा दिलेला आहे. महाराष्ट्राचा बिहार करू नये असे देखील ठणकावले तसेच महाराष्ट्राचा बिहार करून मोठे होऊ नये आपले नृत्य शैली सुधारावी, असा इशारा घनश्याम यांनी गौतमीला दिला.