पिंपरी चिंचवड महानगरपालिका तुम्हा सर्वांना माहिती आहे. शहराचा विकास आणि प्रगती व्हावी याकरिता व वाढलेला कामाचा बोजा कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नवीन भरती काढलेली आहे. या भरतीमुळे तरुणांना विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे.
वाढलेलं कामाचा बोजा ध्यानात ठेवून पिंपरी चिंचवड ने लवकरच मोठी भरती काढण्याचे निश्चित केलेले आहे. तत्पूर्वी 11513 पदे मंजूर करण्यात आले होते परंतु काही पदे आता वाढवण्यात आलेले आहे तसेच लवकरच नवीन भरती जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा : पुणे शहरात झाली अजब चोरी; पोलीस झाले हैराण : वाचा नेमके प्रकरण
पुणे शहरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा व श्रेणीमध्ये समावेश झालेला आहे. महानगरपालिकेतील वाढती लोकसंख्या व कामाचा बोजा यासारख्या गोष्टी विचारात घेता महानगरपालिकेने आतापर्यंत 5325 अतिरिक्त पदांची संख्या देखील ठरवली आहे
विविध श्रेणीमध्ये एकंदरीत 16838 पदांसाठी नवीन अर्ज मागवले जाणार आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये मागील जे मॉडल ठरवण्यात आले होते, त्या मॉडेलनुसार 5325 नवीन पदे यांचा समावेश करण्यात आला आहे.
यापूर्वी ही भरती तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यकालमध्ये तयार करण्यात आली होती, परंतु महाराष्ट्र राज्य सरकारने या भरतीला मंजुरी दिली नव्हती. त्याचबरोबर कोरोनाची भीषण परिस्थिती निर्माण असल्यामुळे भरतीला बंदी देखील घालण्यात आली होती, अशावेळी ही सारे पदे रिकामीच ठेवण्यात आलेली.
फक्त अश्यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील आणि अत्यावश्यक मानले गेलेल्या सेवांमधील काही पदे भरण्यात आली होती. इतर जी काही पदे होती ती तशीच रिकामी ठेवण्यात आलेली होती.
महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय विभागातील जे परिचारक आहेत त्या पदांसाठी एका खाजगी संस्थेवर मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत l. उर्वरित काही जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
लवकरच नवीन पदांसाठी मोठी भरती देखील काढण्यात येणार आहे, ज्यात गट क्रमांक अ ब क संवर्गातील 16838 पदे समाविष्ट असणार आहेत. ही भरती लवकर सुरू होईल या भरतीमुळे तरुणांना संधी मिळणार आहे. लवकरच ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविले जातील.विद्यार्थ्यांनी सातवी आणि बारावी पूर्ण केलेली आहे, अश्या विद्यार्थ्यांना देखील या भरतीच्या निमित्ताने सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे.