फास्ट एक्सच्या माध्यमातून हॉलिवूड चित्रपटाचे पुण्यात  प्रथमच प्रमोशन

46

पुणे : फास्ट एक्स रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहे. फास्ट एक्स  पुण्यातील नेक्सस वेस्टेंड मॉलच्या थिएटरमध्ये रसिकांना आयुष्यभराचा थरारक अनुभव देण्यासाठी 16 मे रोजी विविध स्टंट प्रदर्शनाचे आयोजन केले होते. विन डिझेल, मिशेल रॉड्रिग्ज, टायरेस गिब्सन, जॉन सीना, नॅथली इमॅन्युएल, जॉर्डाना ब्रूस्टर, सुंग कांग, स्कॉट ईस्टवुड, डॅनिएला मेल्चियर, ॲलन रिचसन, मेडो वॉकर, लिओ अबेलो पेरी, हेलन मिरेन, ब्री लार्सन, रिटा मोरेनो, सेंट जेसन आणि चार्लीझ थेरॉन फास्ट एक्स 18 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे

फास्ट एक्सचा भव्य स्पेशल प्रीमियर आयमॅक्स, सिनेपोलिस येथे नेक्सस वेस्टेंड मॉल पुणे येथे काही आश्चर्यकारक कार स्टंट्स आणि  मोटरसाइकिल स्टंट सह आयोजित केला गेला.  भारतात पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या या प्रमोशन प्रदर्शनात 200+ कार आणि बाइक्स सहभागी झाले  होते त्यांनी डोळे दिपवून टाकणारे कर्तब करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

VIDEO : धक्कादायक : पुण्यातल्या पोलीसांना ‘राजकीय हात’ लागतोच कशाला? पुण्यात पोलीसांचे चाललंय काय? अल्पवयीन मुलांना पोलीसांकडुन जबर मारहाण; कुटुंबीयांना शिवीगाळ तसेच उर्मट भाषा वापरल्याची माहिती

लुईस लेटरियर दिग्दर्शित आणि जस्टिन लिन आणि डॅन मॅझ्यू यांनी लिहिलेला, फास्ट एक्स 18 मे 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, त्यामुळे या वर्षातील सर्वात अपेक्षित चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू – IMAX   3D, 3D, 4DX आणि 2D. मध्ये उपलब्ध होणार आहे.