FedEx तर्फे ५० वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी एएमईएमध्ये शाश्वततेवर आधारित ‘५० डेज ऑफ केयरिंग’ उपक्रमाचे आयोजन

77
FedEx to celebrate 50th anniversary with '50 Days of Caring' initiative based on sustainability in AMEA

पुणे : FedEx Express (FedEx) या FedEx Corp. ची (NYSE: FDX) उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनीने ’५० डेज ऑफ केयरिंग’ हा सामाजिक उपक्रम साजरा केला असून तो आशिया पॅसिफिक, मध्यपूर्व आणि आफ्रिका (एएमईए) भागात राबवण्यात आला. १७ एप्रिल रोजी कंपनीचा ५० वा वर्धापनदिन असून त्यानिमित्ताने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

FedEx to celebrate 50th anniversary with '50 Days of Caring' initiative based on sustainability in AMEA

ऑस्ट्रेलिया, बहारिन, इजिप्त, हाँग काँग, भारत, इंडोनेशिया, जपान, कोरिया, कुवेत, मलेशिया, मेनलँड चायना, नायजेरिया, फिलीपाइन्स, सौदी अरेबिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, तैवान, थायलंड, संयुक्त अरब अमिराती, व्हिएतनाम आणि झांबिया यांसाह २१ एएमईए बाजारपेठांतील अंदाजे १००० FedEx स्वयंसेवकांनी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले. हे उपक्रम शाश्वतता आणि पर्यावरण संरक्षण, शिक्षण, जनकल्याण आणि वंचितांना मदत करण्यावर केंद्रित होते.

FedEx to celebrate 50th anniversary with '50 Days of Caring' initiative based on sustainability in AMEA

त्यामध्ये पुढील उपक्रम राबवण्यात आले.

  • ऑस्ट्रेलिया, बहारिन, मेनलँड चायना, भारत आणि दक्षिण आफ्रिका, युएई येथील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, कचऱ्याचे प्रमाण कमी करणे आणि किनारपट्टीवर स्वच्छ समाज उभारणे. मुंबई, भारतातून विघटनशील नसलेला १०५.३४ टन कचरा गोळा करण्यात आला, तर लँडफिलमधून १७२.५६ क्यबिक यार्ड्स कचरा उचलण्यात आला व ९३.२५ टन्स कार्बन उत्सर्जनाची भरपाई करण्यात आली. जपानमधील बागेची स्वच्छता आणि भारत, युएई, बहारिन, कुवेत, इजिप्त, नायजेरिया, केन्या आणि दक्षिण आफ्रिका येथे कचरा गोळा करण्याची मोहीम राबवून स्वच्छ आणि कचरामुक्त पर्यावरण तयार करण्यात आले. भारतातील FedEx स्वयंसेवकांनी त्यांचे ऑफिस तसेच घराच्या आसपासच्या भागातून ३.३६ सुका कचरा गोळा करून पर्यावरणाची स्वच्छता केली.
  • मेनलँड चायना, सिंगापूर, व्हिएतनाम येथे वृक्षारोपण, कुवेत आणि सौदी अरेबियातील कार्यालयीन परिसरात झुडुपांची लागवड, तर भारतात ३००० मँग्रोव्ह्जचे रोपण.
  • भारतातील आर्थिकदृष्ट्या वंचित समाजातील ६५०० मुलांचा भावनिक, शारीरिक व सामाजिक विकास करण्याच्या हेतूने रिसायकल केलेल्या साहित्यापासून बनवलेला परिसर खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला.
  • समर्थनम ट्रस्टची नेत्रहीन मुले आणि भारतातील FedEx स्वयंसेवकांमध्ये क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले व त्यामध्ये या खास क्रिकेट खेळाडूंना आपले क्षमता व कौशल्य दाखवण्याची तसेच मैदानावरील कामगिरी साजरी करण्याची संधी देण्यात आली.
  • अक्षय पात्र संस्थेच्या मिडडे मील उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतात जेवणाचे वाटप करत वंचितांना पोषक जेवण पुरवण्यात आले.
  •  थायलंडमध्ये जुन्या कापडाचे वाटप, इंडोनेशियामध्ये FedEx च्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे वाटप करून अपसायकलिंग
  •  पर्यावरणपूरक राहाणीमान/जेवण रस्ते सुरक्षा, शाश्वत लॉजिस्टिक शिक्षण या विषयांवर आधारित शैक्षणिक सेमिनार्सचे फिलीपाइन्स, मेनलँड चायना, हाँग काँग, तैवान आणि कोरिया येथे आयोजन.

FedEx to celebrate 50th anniversary with '50 Days of Caring' initiative based on sustainability in AMEA

‘एकमेकांशी जोडलं गेलेलं जग हे जास्त चांगलं असतं यावर FedEx चा विश्वास आहे. पहिल्या पाच दशकांत आम्ही लोक आणि व्यवसायांना समृद्धी मिळवण्यासाठी मदत केली. त्यामध्ये आमचे स्त्रोत आणि नेटवर्क अशा जिथे सकारात्मक परिणाम घडवून आणता येऊ शकेल अशा ठिकाणी योगदान दिले,’ असे FedEx Express च्या आशिया पॅसिफिक, मध्यपूर्व आणि आफ्रिका (एएमईए) प्रदेशाचे अध्यक्ष कवल प्रीत म्हणाले.

वर्धापनदिनानिमित्त जग अधिक सुंदर बनवण्यासाठी आमच्या टीम सदस्यांना योगदान देताना व त्यातून सकारात्मक परिणाम घडवून आणल्याचे पाहाताना मला अभिमान वाटत आहे. ग्राहकांना, समाजाला सर्वोत्तम सेवा देण्याचे व त्याचबरोबर अधिक शाश्वत जग उभारण्याचे ध्येय आमच्या टीम सदस्यांना एकजुटीने काम करण्याची प्रेरणा देते. आमच्या पहिल्या पाच दशकांप्रमाणेच सुधारित भविष्य तयार करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. 

१०९३ मध्ये FedEx ची स्थापना झाल्यापासूनची ५० वर्ष साजरी करण्यासाठी कंपनी सातत्याने आपल्या टीम सदस्यांचे योगदान, निष्ठावान ग्राहकवर्ग यांची दखल घेण्यासाठी आणि यापुढच्या कंपनीच्या योजना जाहीर करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत आहे. FedEx ५० व्या वर्धापनदिनानिमित्त अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा –  here.