भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही भारतामध्ये अनेक जण शेती करतात. अनेकांचा व्यवसाय हा शेतीवर टिकलेला आहे. जर शेतकऱ्याने शेती केली नाही तर सर्वसामान्यांपर्यंत देखील अन्नधान्य पोचणार नाही.
शेतकरी जिवापाड मेहनत करतो परंतु त्याच्या वाटेला अनेकदा संकटे येत असतात. कधी आर्थिक संकट तर कधी नैसर्गिक संकटे यामुळे शेतकऱ्याचे जीवन नकोसे होऊन जाते, त्याचबरोबर शेतकऱ्यांना पिकाचा भाव देखील योग्य मिळत नाही.
आपत्कालीन नैसर्गिक परिस्थिती निर्माण झाल्याने शेतात खूप सारे नुकसान होऊ लागते. शेतकरी खूप सारा पैसा पिकांमध्ये अडकवत असतो,अशावेळी त्याला परतावा म्हणून शून्य रुपया मिळतो.
हेही वाचा : जुलैपासून बदलणार ‘हे’ नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम! जाणून घ्या सविस्तर माहिती…
अनेकदा शेतकऱ्यांना या सर्व कारणांमुळे आत्महत्या देखील करावी लागते. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणलेली आहे लवकरच शेतकऱ्यांना सर्व “समावेशक पीक विमा योजना” अनुभवता येणार आहे.
या पीक योजना अंतर्गत शेतकऱ्यांना फक्त एक रुपया मोजावे लागणार आहे. या एक रुपयाच्या बदल्यातच शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी देखील यंदाच्या खरीप हंगामापासून करण्यात आलेली आहे.
या सर्व समावेशक पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत अवधी देण्यात आलेला आहे. या 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पिकाचा विमा काढता येणार आहे.
केंद्रामध्ये पंतप्रधान पिक विमा योजना च्या धर्तीवरच राज्य सरकारने ही योजना लागू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 22 -23 व 25-26 दरम्यान लाभ घेता येणार आहे, याची माहिती कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. जर भविष्यात पिकावर एखादा रोग आला किंवा नैसर्गिक आपत्ती आपत्कालीन परिस्थिती या सर्व गोष्टी आता या विमा मध्ये समावेश केल्या जातील म्हणूनच भविष्य शेतकऱ्यांना आता चिंता करायची गरज नाही.
सध्या ही योजना ठराविक अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठीच करण्यात आलेली आहे. कालांतराने एकेक टप्प्यांमध्ये ही योजना सर्व ठिकाणी लागू करण्यात येईल. या योजनेत 110% भारदेखील हा विमा उतरेल व त्याच्यापेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर राज्य सरकार तुम्हाला विमा किमतीत मदत करेल.
या योजनेचा लाभ घेतल्याने शेतकऱ्यांच्या समस्यावर उपाय निघू शकेल, असे देखील कृषी अधिकारी यांनी सांगितले. ही योजना पुणे जिल्ह्यातील अनेक गावी राबवली जाणार आहे, यामध्ये हवेली, मुळशी, भोर, जुन्नर, इंदापूर, खेड, बारामती या सर्वांचा समावेश आहे.