ED : भाजपच्या नेत्यासोबत वाद झाल्याने ‘त्याला’ आले ईडीचे समन्स; बँक खात्यातील रक्कम वाचून येईल हसू

ED : खात्यात अवघे 450 रुपये असलेल्या शेतकरी बंधूंना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहे. हा प्रकार तमिळनाडूमधला असून या शेतकऱ्यांची नाव कन्नयन(72वर्षे) आणि कृष्णन ( 66वर्षे) अशी आहेत. या दोघांकडे 6.5 एकरची जमीन असून त्यावर हे दोघे शेती करतात.

Morning Good News #Pension : ‘ते’ सरकारी कर्मचारी खूश; जुन्या पेन्शनचा मिळणार लाभ; सरकारचा मोठा निर्णय

सालेम जिल्ह्यातील भाजप नेता जी गुणशेखर याने आपली जमीन बळकावल्याचा आरोप या शेतकरी बंधूंनी केला होता. शेतजमीन बळकावल्याच्या प्रकरणावरून शेतकरी बंधू आणि गुणशेखर यांनी एकमेकांविरोधात पोलीस तक्रारीही दाखल केल्या आहेत. हा वाद सुरू असताना जुलै 2023 मध्ये या शेतकऱ्यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले. खात्यात अवघे 450 रुपये असलेल्या आपल्यासारख्या शेतकऱ्यांना ईडीने का नोटीस पाठवली असेल असा प्रश्न या शेतकऱ्यांना कन्नयन आणि कृष्णन यांना पडला होता. ईडीने या दोघांना पाठवलेली नोटीस दोन-तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

Indian National Congress : राज्याच्या राजकारणात खळबळ; काँग्रेसने ४८…

ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कृष्णन यांनी पोलिसांत धाव घेत पुन्हा गुणशेखर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. गुणशेखर यांनी 4 जानेवारीच्या सकाळी आपल्याला धमकावल्याचं कृष्णन यांनी तक्रारीत म्हटलं आहे. कन्नयन आणि कृष्णन हे मागासवर्गीय असून गुणशेखर यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळही केल्याचा कृष्णन यांनी आरोप केला आहे. गुणशेखर यांच्याविरोधात आपण 2020 सालापासून लढत असून त्याची माणसे आम्हाला आमच्याच शेतामध्ये जाण्यापासून गेली 3 वर्षे रोखत आहेत असे कृष्णन यांनी म्हटले आहे. कन्नयन यांना महिन्याला 1 हजार रुपये निवृत्तीवेतन आणि रेशनच्या दुकानातून मोफत तांदूळ मिळतो, त्यावरच आम्ही 3 वर्षे काढल्याचे कृष्णन यांनी म्हटले आहे.

Kannayan-and-Krishnan-Farmers-who-got-ED-notice-653x420

कन्नयन आणि कृष्णन यांच्याविरोधात 2017 साली शेताला अनधिकृतरित्या कुंपण घातल्याचा आरोप होता. कुंपणाला विद्युत प्रवाह जोडल्याने दोन बैलांचा शॉक लागून मृत्यू झाला असा या दोघांवर आरोप होता. सदर प्रकरणी या दोघांवर खटला चालला ज्यातून ते निर्दोष सुटले होते. याच प्रकरणातून ईडीने या शेतकरी बंधूंविरोधात मनी लॉण्ड्रींगचा आरोप करत त्यांना समन्स धाडल्याचे कळते आहे. या शेतकऱ्यांविरोधात पीएमएलए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे कारण काय असा प्रश्न विचारला असता चेन्नईतील ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले की ही आमच्याकडून झालेली एक चूक असून हे सगळं प्रकरण उगाच मोठं करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी हे तमिळनाडू दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यापूर्वी हे प्रकरण तापवण्यात आल्याचं या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

Vivo X100 Series : विवो एक्स १०० सीरिज भारतात लॉन्च; कॅमेरा क्वालिटीत आयफोनपेक्षा वरचढ

समन्स मिळाल्यानंतर कन्नयन आणि कृष्णन हे 250 किलोमीटरचा प्रवास करून ED कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या वकील प्रविणा देखील होत्या. कृष्णन म्हणाले, “ईडी अधिकाऱ्यांनी आम्हाला फॉर्मची दोन बंडले दिली, यातला प्रत्येक फॉर्म हा किमान 20 पानांचा होता. आम्ही अशिक्षित असल्याने प्रविणा यांनी आम्हाला ते भरण्यास मदत केली. मग, प्रविणा यांना तिथून जाण्यास सांगण्यात आले, कारण त्यांना आमची चौकशी करायची होती. आम्ही त्यांना सांगितले की आमच्या जमिनीच्या नोंदी आधीच सादर केल्या आहेत. प्रविणा यांनी पीएमएलए कायद्याक वकिलाला चौकशीदरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी आहे असे सांगितल्यानंतर ईडी अधिकारी भडकले त्यांना असा काही कायदा नसल्याचे सांगून प्रविणा यांना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावर आम्ही ईडी अधिकाऱ्यांना सांगितले की प्रविणा असतील तरच आम्ही थांबू नाहीतर आम्ही निघून जाऊ.”

Ultratech Company : अल्ट्राटेक कंपनीच्या दडपशाही विरुद्ध कामगार झाले एकत्र; पहा Video

इतकं झाल्यानंतरही ईडी अधिकाऱ्यांनी प्रविणा यांना तिथे थांबण्याची परवानगी दिली नाही, यामुळे त्यांनी जवळचे पोलीस स्टेशन गाठून मदत मागितली. प्रविणा यांनी नियमांचा हवाला देत, पोलिस पथकाने त्यांना ईडी कार्यालयात प्रवेश द्यावा अशी विनंती केली. इकडे प्रविणा यांना बाहेर काढल्यानंतर शेतकरी बंधूंनी अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास नकार दिला ज्यामुळे अधिकाऱ्यांनी आपल्यावर ओरडायला सुरूवात केली असे कृष्णन यांनी सांगितले. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना जरी फोन केला तरी तुम्हाला पुन्हा समन्स पाठवू अशी धमकी या अधिकाऱ्यांनी दिली. ही धमकी देत असतानाचा आपण व्हिडीओ रेकॉर्ड करून तो पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात पुरावा म्हणून सादर केल्याचे प्रविणा यांनी म्हटले. पोलिसांनीही सदर प्रकरणात आपल्याला फारसे सहकार्य केले नाही 31 डिसेंबरला पोलिसांनी माझी अनेक तास चौकशी केल्याचे प्रविणा यांनी म्हटले आहे.