पुण्यातल्या हिंजवडीच्या चौकातील तो प्रयोग यशस्वी, कसा होणार फायदा वाचा

61

पुणे शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर सतावत आहे, अशावेळी ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी स्मार्ट सिग्नल बसविण्यात आले होते.

गेल्या आठ दिवसापासून विनोदे वस्ती चौकामध्ये हे सिग्नल लावलेले असून त्याचा सकारात्मक परिणाम देखील दिसून येत आहे यामुळे लवकरच वाहतूक कोंडी दूर होईल असे चित्र दिसत आहे.

हिंजवडी चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण व्हायची याकरिता हे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी विनोदे वस्ती चौकामध्ये आयुक्तालयातील पहिला सिग्नल बसवण्यात आला. हा स्मार्ट सिग्नल आहे.

या सिग्नलला सीसीटीव्ही कॅमेरा सोबतच सेन्सर असल्याने वाहनाच्या गर्दीवर लागणारा वेळ देखील ठरवता येतो आणि म्हणूनच या स्मार्ट सिग्नलमुळे या भागातील वाहतूक कोंडी हळूहळू कमी होत आहे असे पाहायला मिळत आहे.

शहरातील एका संगणक अभियांत्रिकाने हा प्रयोग केलेला आहे आणि हा प्रयोग काही प्रमाणात यशस्वी देखील होताना दिसत आहे.

जर पुढील दिवसांमध्ये अजून काही सकारात्मक परिणाम दिसू लागले तर हे स्मार्ट सिग्नल शहरातील वेगवेगळ्या चौकामध्ये बसविण्यात येतील असे देखील सांगण्यात येत आहेत.

घरात पक्षी पाळण्याचा विचार करत असाल तर सावधान…!

रावेत येथे राहणारे प्रशांत गिलबिले यांनी हा उपक्रम राबविला आहे. प्रशांत स्वतः संगणक अभियंता आहे. यांनी हा सिग्नल बनवला आहे. या सिग्नलचा पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात आलेला आहे. गिलबिले यांच्या टीमने हा प्रयोग वर्षभर केलेला आहे. एकंदरीत 16 जणांची ही टीम असून त्यांनी स्मार्ट सिग्नल या प्रकल्पावर खूपच मेहनत घेतलेली आहे.

या स्मार्ट सिग्नल ला सीसीटीव्ही कॅमेरा आणि सेंसर बसवण्यात आलेले आहे, यामुळे वाहनाच्या गर्दीवर सिग्नलची वेळ बदलते. गाड्यांची संख्या मोजूनच सिग्नल बदलला जातो.

जर सिग्नल वर एकही गाडी नसेल तर सिग्नल पडत नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णवाहिका सायरन अथवा दिव्याची गाडी आल्यास हा सिग्नल हिरवा होतो.

चौकामध्ये जर सगळीकडे गर्दी असेल तर सिग्नल वेळ देखील बदलतो आणि ग्रीन कॉरिडोर किंवा व्हीआयपी मोमेंटला हा सिग्नल आपोआप नियंत्रण करतो म्हणूनच गरज पडल्यावर हा सिग्नल आपल्याला हाताळता देखील येऊ शकतो.