शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब लटपटें यांच्यामुळे पंचायत समिती वठणीवर
आष्टी : (सा.वा.) : आष्टी तालुक्यातील हजारों गोरगरीब घरकुल धारकांना लोखंडी चुली (शेगड्या)न वाटता त्या भंगाराच्या दुकानाकडे नेऊन विल्हेवाट लावण्याचा आष्टी पंचायत समितीचा डाव शिवसैनिकांच्या सतर्कतेमुळे हाणून पडला.
याबाबत अधिक माहीती अशी की आष्टी तालुक्यातील इंदिरा आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना गेल्या दहा वर्षांपासून लोखंडी चुली मिळाल्या नसल्यामुळे हजारो लाभार्थी लोखंडी चुली (शेगड्या)पासून वंचीत होते.याबाबत लाभार्थयानी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब लटपटे व तालुकाप्रमुख कुमार शेळके यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या .पंचायत समिती मधील दलाल हे या लोखंडी चुली छुप्या मार्गाने लाभार्थीयांना अवैध मार्गाने विक्री करत असल्याच्या तक्रारी देखील शिवसेनेकडे आल्या होत्या .विक्रीतून शिल्लक राहिलेल्या काही चुली या दडवून ठेवल्या आहेत व या हजारो चुली गायब करुण भंगरात विक्री करण्याचा पंचायत समितीतील काही जन प्रयत्नात असल्याचा सुगावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना लागताच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब लटपटे यांनी तात्काळ आष्टी पंचायत समितीत धाव घेतली.तेथे लटपटे यांनी पत्रकारांच्या समक्ष भेट दिली असता हजारो लोखंडी चुली गोरगरिबांना न वाटता लपवून ठेवल्या असल्याचे रंगेहात पकडल्याने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सरगर व कर्मचाऱ्यांची अक्षरश बोबडी वळली.तुम्ही गोरगरिबांची या चूली का वाटल्या नाहीत.लटपटे यांनी रुद्रावतार घेत तुम्ही गरिबांना चुली का वाटल्या नाहीत.तुम्ही कोणत्या भंगराच्या दुकानात या शेगड्यांची विल्हेवाट लावणार होतात अशा प्रश्नांचा भडिमार करीत लटपटे यांनी सर्व लोखंडी चुलींचा पंचनामा करुण उदयापासूनच गोरगरिब लाभार्थयांना वाटण्याची मागणी केली.या शेगड्यांची मोजदाद करुण पंचनामा करण्यात आल्याने पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा डाव लटपटे व शिवसैनिकांच्या सावधतेमुळे अक्षरशः फसला .या प्रकरणी आपण वरिष्ठ स्तरावर तक्रारी करणार असुन दोषिंवर कारवाई ची मागणी करणार असल्याचे लटपटे यांनी सांगितले .सदरील गंभीर घटनेची माहीती लटपटे यांनी शिवसेनेचे उपनेते खा.चंद्रकांत खैरे ,संपर्कप्रमुख सुधीर मोरे ,जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना माहीती दिली असुन हे प्रकरण शिवसेना तडीस लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेगड्यांचा झोल उघडकीस आल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आष्टी पंचायत समिती मध्ये गर्दी झाली होती