लोणी काळभोर : पॉलीसीचे पैसे परत न मिळाल्याने तरडे येथील एका अंगणवाडी सेविकेला शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली असुन लोणी काळभोर पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन राहुल पांडुरंग जगताप ,उत्तम रामचंद्र जगताप, नारायण रामचंद्र जगताप, गौरी राहुल जगताप ,(राहणार जगतापमळा तरडे ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : पुण्यात व्हॅलेंटाईन विकलाच धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीच्या…
तशी फिर्याद विशाल शिवाजी शिंदे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.
या बाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार तरडे येथील अंगणवाडी सेविका हि काम करीत असलेली सहयाद्री अँग्रो इस्टेट ही कंपनी २०१६ मध्येच बंद झाली.
त्यामुळे जगताप यांनी पैशासाठी तगादा लावला.
परंतु सेविकेने तुमची काय तक्रार असेल तर तुम्ही कोर्टात जावा किंवा पोलीस स्टेशन येथे जावुन तक्रार करा. असे वारंवार सांगुन सुद्धा अंगणवाडी सेविकेला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.
हेही वाचा : हि बातमी वाचाल तर महिण्याकाठी हजारो रुपये कमवाल