पावसाळा सुरू होण्यासाठी काही महिने उरलेले आहे म्हणूनच पालिका देखील पावसाळाची पूर्वतयारी करण्यास मग्न आहे,अशावेळी दरवर्षीप्रमाणे पालिका देखील पावसाळ्याच्या दरम्यान शहरात कोणतेही अवैध घटना घडू नये तसेच पाणी साचू नये याकरिता खबरदारी घेत असते.
आता पालिकेने रस्ते खोदण्याचे काम बंद करून रस्त्यांच्या दुरुस्तीवर भर देण्याचे ठरवले आहे, परंतु काही बांधकाम व्यवसाय खाजगी ठेकेदार यांच्याकडून पालिकेची परवानगी न घेता खोदकाम केल्याचे कृत्य दिसून येत आहे. याप्रकरणी पालिकेने दोघांना 92 लाख रुपये चा दंड देखील आकारला आहे.
दरवर्षी महानगरपालिकेतर्फे 1 आक्टोंबर ते 30 एप्रिल या कालावधीत जलवाहिनी, मलवाहिनी, गॅस वाहिनी, विद्युत वाहिनी, मोबाईल व इंटरनेट नेटवर्क साठी केबल टाकण्यासाठी जे रस्ते खोदकाम केले जाते त्या कामासाठी परवानगी दिली जाते.
याकरिता खाजगी कंपनीकडून 12 हजार 192 रुपये प्रति मीटर तर महावितरणाच्या विद्युत वाहिनीसाठी 2 हजार 350 रुपये प्रति मीटर इतके शुल्क देखील घेतली जाते. या रूयांच्या माध्यमातून दरवर्षी महानगरपालिकेला कमीत कमी 250 कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न देखील मिळते, यातूनच जे रस्ते खोदले जातात त्यांची दुरुस्ती केली जाते रस्त्यांमध्ये भरदेखील केली जाते.
1 मे पासून शहरातील विविध भागातील रस्ते खोदकाम पूर्णपणे थांबवण्यात आलेले आहे त्याचबरोबर पाणीपुरवठा व सांडपाणी वाहिनी यासारखे जे अत्यावश्यक व महत्त्वाचे काम आहेत त्यांच्याकरताच महानगरपालिकेने खोदकाम करण्यास परवानगी दिली आहे,
परंतु असे असून देखील काही ठिकाणी शहरांमध्ये बांधकाम व्यवसाय, खाजगी ठेकेदार, मोबाईल कंपन्या कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता रस्त्याचे खोदकाम करत आहेत. अशा घटना देखील दिसून आलेले आहेत.याची माहिती मिळताच महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
औंध डी मार्ट येथील एका बांधकाम व्यवसायकाने रस्त्याची फोन काम खोदकाम केल्यामुळे 41 लाख 69 हजार रुपयांचा दंड लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर वडगाव शेरी येथील एका खाजगी ठेकेदारा कडून 51 लाखाचा दंड घेण्यात आलेला आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे पथविभागाचे प्रमुख विजय कुलकर्णी यांनी माध्यमांना दिली.
काही ठिकाणी महानगरपालिकेने दंड न आकारता तक्रार नोंदवली आहे. एका मोबाईल कंपनीकडून केबल टाकले जात होते, यावेळी महानगरपालिकेने दंड न घेता फक्त स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे परंतु दंड आकारला का नाही? याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केल्यावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केले.