Corona Update : आज राज्यात आढळले इतके कोरोना रुग्ण, चार जणांचा मृत्यू

203
Corona Update : आज राज्यात आढळले इतके कोरोना रुग्ण, चार जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोना (Maharashtra Corona) रुग्णांची वाढ सुरूच आहे. शुक्रवारी (१४ एप्रिल) महाराष्ट्रात ११५२ नवीन रुग्ण आढळले. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५९२८ वर पोहोचली आहे. तर कोरोना संसर्गामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून आलेला हा सलग तिसरा दिवस आहे. गुरुवारी (१३ एप्रिल) राज्यात कोरोनाचे १०८६ नवीन रुग्ण आढळून आले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी (१२ एप्रिल) राज्यात संसर्गाचे १,११५ नवीन रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत ९२० लोक उपचारानंतर बरे झाले आहेत

राज्यात गेल्या २४ तासांत ९२० लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. १४ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात ८० लाख १२६ लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात कोरोनामधून बरे होण्याचा दर ९८.११ टक्के आहे.

सर्वाधिक सक्रिय प्रकरणे मुंबईत आहेत. मुंबईत कोरोनाचे १६३४ सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यात १०५६ सक्रिय रुग्ण आहेत.