Chicken खाण्याचे शौकीन असाल तर व्हा सावध; होऊ शकतात जगातील सर्वात धोकादायक आजार

127

जर तुम्ही चिकन (Chicken) खाण्याचे शौकीन असाल आणि वरचेवर ते खात असाल, तर सावध व्हा. कारण तुमचे आवडते चिकन तुम्हाला जगातील 10 व्या सर्वात मोठ्या आजाराचा शिकार बनवू शकते. ही बाब लक्षात घेऊन डब्ल्यूएचओ (WHO) ने देखील याबाबत इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने सांगितले आहे की, कोंबडीमुळे अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजेच AMR होऊ शकतो, जो जगातील दहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा आजार आहे. आरोग्य तज्ज्ञ डॉ. एम. वाली यांनी सांगितले की, चिकन खाल्ल्याने लोक एएमआरला जलद बळी पडत आहेत.

चिकनमध्ये प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. आता प्रश्न पडतो, ही पोषक तत्व तुम्हाला आजारी कसे बनवू शकतात? तर आजकाल पोल्‍ट्री फार्ममध्ये कोंबडीला निरोगी बनवण्‍यासाठी आणि ताजे ठेवण्यासाठी प्रतिजैविके (Antibiotics) दिली जातात. यामुळे कोंबडीच्‍या शरीरात खूप जास्त प्रमाणात अँटीबायोटिक जमा होतात. ज्याचा थेट परिणाम कोंबडी खाणाऱ्याच्या शरीरावर होतो. ही कोंबडी खाल्ल्यानंतर कोंबडीच्या आत असलेले अँटीबायोटिक खाणाऱ्याच्या शरीरात जमा होते.

अशा प्रकारच्या चिकनचे सेवन केल्याने तुमच्या शरीरात अँटीबायोटिक प्रतिरोधक क्षमता वाढू लागते आणि त्याचा वाईट परिणाम म्हणजे, तुमच्या शरीरावर अँटीबायोटिक्सचा प्रभाव कमी होऊ लागतो. चिकन खाल्ल्यानंतर शरीरात येणारे अँटिबायोटिक्स काही काळानंतर अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स एएमआरमध्ये बदलतात आणि अशा स्थितीत शरीर अनेक प्रकारच्या संसर्गांना बळी पडू शकते. महत्वाचे म्हणजे या संसर्गावर उपचार करणे देखील खूप कठीण आणि अशक्य आहे.

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शरीरात ज्या पद्धतीने शरीरात अँटिबायोटिक्स जमा होऊन एएमआरची समस्या वाढत आहे, ते पाहता जीवनात शाकाहार स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आहारात हिरव्या भाज्या, पनीर, दूध, दही अशा गोष्टींचा वापर केला पाहिजे.