छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात दिसायचे असे? AI ने बनवले असे काही फोटो की पाहणारे झाले थक्क!

51

तंत्रज्ञानाचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. मानवी बुद्धी आणि तंत्रज्ञाने यांच्या मिलापाने आता हवे असलेल्या गोष्टी सहज शक्य करता येत आहे परंतु एआय( AI) म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने आपण आपल्याला हवे असलेल्या गोष्टी किंवा इतिहासात घडलेल्या घटना या जाणून घेऊ शकतो. नुकतेच AI ने काही फोटो बनवलेले आहेत. या फोटो गॅलरीमध्ये आपल्याला चंद्रगुप्त मोर्य,पृथ्वीराज चव्हाण, सम्राट अशोक यासारखे महान व्यक्तिमत्त्व असलेल्या राजांचे फोटो पाहायला मिळणार आहेत. हे फोटो पाहून अनेक जण थक्क देखील होत आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराजांची किर्ती आजपर्यंत आपल्याला प्रेरणा देत आहे. यावर्षी संपूर्ण विश्व छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा साजरा करत आहे तसेच रायगडावर त्याची जय्यत तयारी देखील झाली. राज्य सरकारने देखील या निमित्ताने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित केले. हा सोहळा पाहण्यासाठी अख्खा महाराष्ट्र रायगडावर उपस्थित होता. आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये आजही असे अनेक प्रश्न आहेत, जे महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी इच्छुक व आतुर ठरतात.

महाराजांचा राज्याभिषेक होत असताना महाराज नेमके कसे दिसत असे? असा प्रश्न देखील अनेकांच्या मनामध्ये आला असेल परंतु त्यावेळी काही कॅमेरा किंवा कोणत्याही तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष महाराज कसे दिसायचे याचे काही पुरावे नाही परंतु आता आपल्याकडे एआय आहे. या नव्या तंत्रज्ञांच्या मदतीने आपण कल्पनेतील चित्र अस्तित्वात आणू शकतो म्हणूनच शिवाजी महाराज नव्हे तर 400 -500 वर्षांपूर्वी अनेक राजांचे AI ने फोटो प्रसिद्ध केलेले आहेत.

या फोटो गॅलरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य प्रख्यात मोगल सम्राट अकबर, पृथ्वीराज चव्हाण यासारख्या प्रसिद्ध राजांची फोटो देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराज कसे दिसायचे हे AI ne बनवलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहेत त्यांची चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.