WhatsApp वर नंबरशिवाय मारा भरपूर गप्पा, चॅटिंगचा मार्ग होईल सोपा !

59

आपल्यापैकी अनेक जण स्मार्टफोन वापरतात. या स्मार्टफोन मध्ये व्हाट्सअप नावाचे ऍप्लिकेशन सगळेजण इन्स्टॉल करतात. हल्ली व्हाट्सअप नसले तर जग अपूर्ण आहे,असे वाटू लागते कारण की एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी आपण या ऍप्लिकेशनचा प्रामुख्याने उपयोग करत असतो.

मेटा ची मालकी असलेले व्हाट्सअप ऍप्लिकेशन वापरण्यासाठी आपल्याला मोबाईल नंबरची आवश्यकता असते. परंतु अनेकदा आपण एकमेकांना मेसेज पाठवतो तेव्हा आपल्या मोबाईल नंबर इतरांकडे जातो अशावेळी त्रास देखील निर्माण होण्याची शक्यता असते म्हणूनच हा त्रास दूर करण्यासाठी मेटा ने आता मोबाईल नंबर ऐवजी युजर नंबर वापरण्यासाठी आवश्यक असलेली पद्धत वापरण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.

व्हाट्सअप लवकरच नवीन फीचर घेऊन येणार आहे. हे फीचर सध्या डेव्हलपमेंट मध्ये आहे. या फिचर मध्ये तुम्हाला तुमचे युजरनेम सेट करायला सांगितले जाईल. ज्या पद्धतीने आपण फेसबुक वर, इंस्टाग्राम वापरत असताना आपण आपली युजरनेम सेट करतो त्याच पद्धतीने व्हाट्सअप वापरताना देखील तुम्हाला हे युजरनेम सेट करावे लागेल. या युजरनेमच्या मदतीने तुम्ही एकमेकांना मेसेज पाठवू शकता, असे केल्याने तुमचा मोबाईल नंबर देखील इतरांकडे जाणार नाही.

हि बदललेली पद्धत तुम्हाला तुमच्या व्हाट्सअपच्या सेटिंग मध्ये दिसून येईल. ज्या पद्धतीने आपण व्हाट्सअप वर ठेवलेला फोटो बदलतो त्याच पद्धतीने सेटिंग मध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिलेले असतील. या ऑप्शनच्या मदतीने तुम्ही तुमचे युजरनेम सेट करू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या स्टेटस प्रायव्हसी देखील ठेवू शकता. येणाऱ्या दिवसात ही प्रक्रिया लवकरच आपल्या सर्वांच्या हाती येईल, अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे म्हणूनच भविष्यात एकमेकांना मेसेज करताना आपला मोबाईल नंबर शेअर करणे ऐवजी आपण युजरनेम च्या मदतीने एकमेकांशी गप्पा मारू शकतो.