मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी भवानी पेठेतील वाहतूकीत बदल

157

पुणे : महापालिकेकडून भवानी पेठेतील जुना मोटार स्टॅंड परिसरात मलनिस्सारण वाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामासाठी 30 ऑक्‍टोबरपर्यंत भवानी पेठेतील वाहतूकीत बदल करण्यात येणार आहेत.

भवानी पेठेतील जुना मोटार स्टॅंड ते अलंकार मेडीकल या परिसरात मलनिस्सारण वाहिनीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.

रामोशी गेट चौकातून लष्कर भागात जाणाऱ्या वाहनचालकांनी जुना मोटार स्टॅंड येथून डावीकडे वळून पद्मजी चौकमार्गे इच्छित स्थळी जावे. लष्कर भागातून येणाऱ्या वाहनचालकांनी अल नायब हॉटेल चौकातून वळून कुरेशी मशीदमार्गे बाबाजान चौकाकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.