“चांदणी” मॅडमला लाच घेताना रंगेहात पकडले, असा रचला सापळा की अधिकारी देखील झाले थक्क!

129

सरकारी पातळीवर होणारा घोटाळा, भ्रष्टाचार या काही गोष्टी सर्वसामान्य नागरिकांना नवीन नाही. अनेकदा छोटे-मोठे कामे करण्यासाठी सरकारी अधिकारींकडून पैसे उकळले जातात.

अनेकदा नाईलाज म्हणून सर्वसामान्य नागरिकांना पैसे द्यावे देखील लागतात आणि आपले काम कमी वेळामध्ये पूर्ण देखील करून घ्यावे लागतात.

या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये पुरुष तर अव्वल आहे परंतु महिला अधिकारी देखील मोठ्या प्रमाणावर आता आपल्याला दिसून येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात एका महिला पुरवठा अधिकारी देखील भ्रष्टाचार सापळ्यात अडकलेली आहे. त्या महिलेला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलेले आहे. एसीबी पथकाने या महिलेवर कारवाई देखील केलेली आहे. यवतमाळ तहसील कार्यालयात 24 तारखेला ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार चांदणी शेषराव शिवरकर या अधिकाऱ्याचे नाव आहे. ही महिला 42 वर्षाची असून तिच्यावर तक्रार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावाने रास्तेभाव धान्य दुकानाचे नाव होते.त्यांना वारसा पद्धतीने नाव बदल करून हवा होता.

या तहसील कार्यालयामध्ये लवकरात लवकर अहवाल सादर करण्यासाठी पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकारी चांदणी शिरवळकर यांनी लाचखोर पणा व तड जोड पणा दाखवून वीस हजार रुपयाची मागणी देखील केली परंतु तक्रारदाराने यापूर्वीच चांदणी यांना दहा हजार रुपये रोख दिले होते.

हेही वाचा : परदेशी बँकेतील नोकरी सोडून दोन सख्या भावांनी गायींच्या जीवावर केली कोट्यावधींची उलाढाल !

आता त्यांच्याकडे मॅडमला देण्यासाठी पैसे नव्हते म्हणूनच तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 फोर या टोल फ्री नंबर वर संपर्क साधला आणि चांदणी यांच्या विरोधात तक्रार केली. मिळालेल्या तक्रारीनुसार एसीबी पथकाने यवतमाळ तहसील कार्यालयात सापळा रचला आणि या महिला अधिकाऱ्याला रंगेहात पकडले, तेव्हा या महिलेकडे रोख रक्कम देखील सापडली.

ही कारवाई अमरावती परिक्षेत्र लाच लचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलीस उपाधीक्षक संजय महाजन, शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे, त्याचबरोबर जर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने सर्वसामान्य व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारची लाच मागितली तर त्यासाठी 1064 हा टोल फ्री नंबर आहे.

या नंबरच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक व तक्रारदार आपली तक्रार नोंदवून ठेवू शकतो, अशावेळी तक्रारदाराची ओळख ही गुप्त ठेवली जाते.