महिलेला गाठून भररस्त्यात केले ‘हे’ कृत्य; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

491

दुचाकीवरुन भरधाव वेगात येऊन एकट्यादुकट्या व्यक्तीला गाठून दुचाकीचा वग हळूच कमी करत अथवा सदर व्यक्तीस बोलण्यात गुंतवून गळ्यातील दागिणे हिसकावण्याच्या घटना अद्यापही सुरुच आहेत.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली अशाच एका घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ पुणे (Pune) येथील हडपसर (Hadapsar) परिसरातील आहे. या परिसरातील ईस्टर्न इलेगन्स सोसायटी समोर ही घटना घडल्याचे समजते.

व्हिडिओत पाहायला मिळते की, एक महिला रस्त्याने पायी निघाली होती. ती महिला रस्त्यावरुन एकटीच निघाली होती. इतक्यात दुचाकीवरुन आले. त्यांनी महिलेच्या गळ्यात हात घातला आणि तिचे दागिणे हिसकावून दुचाकीवरुनच पळ काढला. ही घटना अवघ्या काही सेकंदात घडली.

अचानक घडलेल्या घटनेमुळे महिलाही गांगरुन गेली. सुरुवातीला तिला काही कळलेच नाही. नंतर घडला प्रकार लक्षात येताच तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला खरा. परंतू, काहीच उपयोग झाला नाही. दुचाकीस्वार तोपर्यंत पसार झाले. @kirantajne या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

मंगळसूत्र हिसकावणे किंवा चेन स्नॅचिंग हा दरोड्याचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये चोर दुचाकी अथवा इतर वाहन किंवा काही प्रकरणांमध्ये पायी येऊन एखाद्या व्यक्तीच्या गळ्यातील चेन किंवा नेकलेस जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून जातो. रस्त्यावरील गुन्ह्यांचा हा एक सामान्य प्रकार आहे. जो अनेकदा गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी, जसे की बाजारपेठ, बस स्टँड किंवा मंदिरांजवळ घडतो.

चेन स्नॅचिंग हा पीडित व्यक्तीसाठी अत्यंत क्लेशकारक अनुभव असू शकतो. अशा प्रकारची घटना अनेकदा अचानक आणि अजाणतेपणे घडते. त्यामुळे पीडिताला असुरक्षित वाटू लागते. काही प्रकरणांमध्ये, लुटमारीच्या वेळी पीडितांना जखमा होऊ शकतात. जसे की, खरचटणे, गळ्याला कच पडणे, शरीराला दुखापत होणे वगैरे.

चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी, आपल्या सभोवतालच्या परिसराची माहिती असणे आणि सार्वजनिक ठिकाणी महागडे दागिने घालणे टाळणे महत्त्वाचे आहे. तुम्ही दागिने घालत असल्यास, ते सुरक्षितपणे बांधलेले आहेत आणि ते फारसे दिसत नाहीत याची खात्री करा. रात्री एकटे चालणे टाळणे आणि योग्य प्रकाश असलेल्या भागात राहणे देखील आवश्यक.