टाटा पंच ठरली भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक कार; भारत-NCAP क्रॅश टेस्टमध्ये नेक्सॉन EV ला सुद्धा 5-स्टार
टाटा पंच EV ही भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक कार बनली आहे. याला भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (BNCAP किंवा Bharat ...
Read more
टाटा पॉवरने उच्च क्षमता असलेले वेगवान चार्जिंग पॉईंट्स बसवून देशभरातील ई-बस चार्जिंग नेटवर्क मजबूत केले
राष्ट्रीय, जून, २०२४: भारतातील सर्वात मोठ्या एकीकृत वीज कंपन्यांपैकी एक आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांना चार्जिंग सेवा पुरवणारी कंपनी टाटा पॉवरने प्रमुख महानगर भागांमध्ये ८५० पेक्षा जास्त चार्जिंग पॉईंट्स तैनात करून देशामध्ये ई-मोबिलिटीच्या दिशेने सुरु असलेल्या परिवर्तनाचे नेतृत्व करणे सुरु ठेवले आहे. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगलोर, जम्मू, श्रीनगर, धारवाड, लखनौ आणि गोवा यासारख्या प्रमुख शहरांमध्ये ३० पेक्षा जास्त बस डेपोंमध्ये चार्जिंग पॉईंट्स लावण्यात आले आहेत. टाटा पॉवरने देशभरातील २३०० पेक्षा जास्त सार्वजनिक ई-बसेसना सक्षम केले आहे. या प्रचंड मोठ्या चार्जिंग नेटवर्कमुळे १ लाख टनांपेक्षा जास्त टेलपाईप कार्बन डाय ऑक्साईड चे उत्सर्जन रोखले जात आहे. टाटा पॉवरने देशभरामध्ये विविध बस डेपो डिझाईन व तयार केले आहेत. टाटा पॉवरच्या चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये १८० ते २४० किलोवॅट रेन्जमधील उच्च क्षमतेचे वेगवान चार्जर्स आहेत, जे सरासरी १ ते १.५ तासांमध्ये चार्जिंग करू शकतात. वेगवान चार्जिंग क्षमतांमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या बसेसच्या संचालनविषयक गरजा पूर्ण होण्यात मदत मिळते. टाटा पॉवरचे सर्वात जास्त ईव्ही चार्जिंग पॉईंट्स दिल्लीमध्ये आहेत, त्यापाठोपाठ मुंबई, बंगलोर, अहमदाबाद, जम्मू आणि श्रीनगरमध्ये कंपनीने ईव्ही चार्जिंग पॉईंट्स बसवले आहेत. ई-मोबिलिटीचा स्वीकार केला जावा यासाठी प्रोत्साहन देण्यात टाटा पॉवर आघाडीवर आहे. विविध ओईएम ऑपरेटर्ससोबत हातमिळवणी करून आणि विविध राज्य सरकारांच्या ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन्सना सेवासुविधा पुरवून वेगाने आगेकूच करत आहे. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी टाटा पॉवरने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व सेवासुविधा पुरवल्या आहेत, ग्राहकांना सर्वोत्तम चार्जिंग अनुभव मिळेल याची काळजी घेतली आहे, कामे वेळेत पूर्ण करून ग्राहकांना सर्वसमावेशक ऑपरेशन आणि मेन्टेनन्स सेवा पुरवण्यावर भर दिला आहे. व्यवसायाचे सर्व कामकाज सुरळीतपणे चालावे यासाठी सांडपाणी प्रक्रिया संयंत्र तसेच नियामक ना हरकत मंजुऱ्या पुरवण्यासारख्या सेवा देखील टाटा पॉवर देते. भारताच्या नेट झिरो उद्दिष्टांना अनुसरून, टाटा पॉवर २०४० पर्यंत नेट झिरो उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बांधील आहे. देशामध्ये सुरु असलेल्या हरित ऊर्जा परिवर्तनामधील आघाडीची कंपनी म्हणून टाटा पॉवरने हरित ऊर्जा उपाययोजनांची सर्वसमावेशक श्रेणी प्रस्तुत केली आहे, यामध्ये रुफटॉप सोलर, होम ऑटोमेशन, स्मार्ट मीटरिंग आणि ईव्ही चार्जिंग यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सस्टेनेबल जीवनशैली स्वीकारण्याला प्रोत्साहन देण्यासाठी देखील टाटा पॉवर प्रयत्नशील आहे. ‘सस्टेनेबल इज अटेनेबल’ या टाटा पॉवरच्या अभियानामुळे ही बांधिलकी अधिक दृढ झाली आहे. या अभियानामध्ये हरित ऊर्जा उपाययोजना स्वीकारण्यास प्रोत्साहन देण्याचे तसेच सस्टेनेबिलिटीचे रूपांतर जनमोहिमेमध्ये करण्याचे टाटा पॉवरचे उद्दिष्ट आहे.
Read more
फॅटी लिव्हर दिना निमित्त, फॅटी लिव्हर रोगाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी रूबी हॉल क्लिनिकचा पुढाकार
पुणे, जून २०२४: फॅटी लिव्हर रोग, जो यकृतात जास्त प्रमाणात चरबी साचल्यामुळे होतो, तो भारतात अधिकाधिक सामान्य होत चालला आहे. ...
Read more
गोदरेज अप्लायन्सेसने पायाभूत सुविधांच्या विस्तारासह रिसर्च आणि डेव्हलपमेंट क्षमता केल्या मजबूत
मुंबई, 12 जून 2024 : गोदरेज ॲण्ड बॉयसचे व्यवसायिक युनिट असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसने पुण्यातील पिरंगुट येथे रिसर्च आणि डेव्हलपमेंट प्रकल्पाचा विस्तार केला ...
Read more
नोंदणी महानिरीक्षक सोनावणे यांना निलंबित करा
पुणे : बेकायदेशीर केलेल्या प्रतिनियुक्त्या रद्द करून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनावणे, नोंदणी उपमहानिरीक्षक उदय चव्हाण, सहायक नोंदणी ...
Read more
महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. प्रसाद देशपांडे यांची निवड
पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. प्रसाद देशपांडे यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी ॲड. ...
Read more
कलर्स वाहिनी प्रस्तुत खतरों के खिलाडी १४ मध्ये मी माझे सर्वोत्तम देईन : बिग बॉस उपविजेता अभिषेक कुमारचे वक्तव्य
भारतातील पहिला स्टंट-आधारित रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ लवकरच १४ व्या सीझनसह परतण्यासाठी सज्ज झाला आहे. हे रोमांचक स्टंट, थरारक ...
Read more
डी डेव्हलपमेंट इंजिनिअर्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 19 जून 2024 पासून सुरू
राष्ट्रीय, जून 2024: डी डेव्हलपमेंट इंजिनिअर्स लिमिटेड (“डी पायपिंग” किंवा “द कंपनी”) ची इक्विटी शेअर्ससाठी प्राथमिक समभाग विक्रीशी संबंधित बोली/ऑफर बुधवार ...
Read more
करण जोहर व मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते उषा काकडे प्रॉडक्शनच्या लोगोचे अनावरण
पुणे : बांधकाम व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उषा काकडे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले असून, त्यांच्या ...
Read more
हृदयस्पर्शी स्वागताने ‘सूर्यदत्त’मधील विद्यार्थी भारावले
पुणे : शिक्षकांनी औक्षण, पाद्यपूजन करत विद्यार्थ्यांच्या गळ्यात मोत्यांच्या माळा घालत केलेल्या हृदयस्पर्शी स्वागताने बावधन येथील सूर्यदत्त नॅशनल स्कुलमधील विद्यार्थी ...
Read more