नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेणे बर्थ डे बॉयच्या चांगलेच अंगलट आले आहे. भोसरी पोलिसांनी आयोजकासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
बर्थ डे बॉय अमित शंकर लांडे आणि आयोजक मयूर रानवडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार दत्तात्रय कांबळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार २१ मे रोजी अमित लांडे याचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
दरम्यान, आयोजकांनी भोसरी पोलिसांकडे या कार्यक्रमासाठी परवानगी मागितली. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या कारणास्तव भोसरी पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली.
तसेच, आयोजकांनी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घ्यावी, असेही सुचवले होते. मात्र, आयोजकांनी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी न घेता कार्यकम घेतला. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.