BREAKING : उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, भाजपसोबत पुन्हा युतीसंदर्भात ठाकरे म्हणाले..

126
narendra-modi-with-uddhav-thackeray-pti

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत पुन्हा जाणार का, यावर भाष्य केलं आहे. ‘मी पुन्हा भाजपसोबत जाणार की नाही हे विसरा, पण त्यांनी मला यामध्ये का ढकललं ? हे त्यांना विचारा, असं उत्तर भाजपसोबत पुन्हा जाणार का, या प्रश्नाला ठाकरे यांनी दिलं.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत देशातील विविध राजकीय घडमोडींवर भाष्य केलं.

भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘भाजप पक्ष संधीसाधू आणि हुकूमशाही पक्ष आहे. जिथे भाजपच्या विरोधात प्रबळ विरोधी पक्ष आहे. तिथे लोक भाजपाच्या विरोधात यापुढे मतदान करतील. आगामी काळात भाजप जातीय ध्रुवीकरणाचा अवलंब करू शकेल’.

शिंदे गटावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या 16 आमदारांना हे अपात्र करावंच लागेल आणि तशा प्रकारचा निर्णय येईल. निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि नावाबद्दलचा निर्णय चुकीच्या पद्धतीने दिलं’.

झेरॉक्सचं दुकान दाखवतो म्हणत प्रवाशासोबत भयानक कांड; नागरिकांमध्ये दहशत, वाचा नेमकं काय घडलं?

‘निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही वीस लाख सदस्य नोंदणीचे कागदपत्र जमा केले.

आमचा पाठिंबा त्यांच्यासमोर दाखवला तरी सुद्धा निर्णय हा त्यांच्या बाजूने गेला हे चुकीचं आहे आणि भविष्यात सुद्धा हे होऊ नये, असे ठाकरे म्हणाले.

‘निवडणूक आयोग पक्षाची नोंदणी करू शकते आणि निवडणूक चिन्ह वाटप करू शकते, परंतु ते कोणाच्याही पक्षाचे नाव ठरवू शकत नाही, असेही ठाकरे पुढे म्हणाले.