Breaking News: पुणे लोकसभा पोटनिवडणुकीचे बिगुल लवकरचं वाजणार? पुढे आली अत्यंत महत्त्वाची अपडेट

78
girish bapat new.jpg

भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेसाठी लवकरच पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याला कारण म्हणजे निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलेली तयारी. कर्नाटकातील विधानसभा निवडणूक संपल्यानंतर बंगळुरुहून तब्बल ४२०० ईव्हीएम मशीन्स पुण्यात आणण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मतदान साहित्यसह इतर संबंधित माहिती पुढील दोन दिवसात सादर करण्याचे पत्र पाठवण्यात आलं आहे.

झेरॉक्सचं दुकान दाखवतो म्हणत प्रवाशासोबत भयानक कांड; नागरिकांमध्ये दहशत, वाचा नेमकं काय घडलं?

तर पोटनिवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच सुरू देखील करण्यात आली आहे. मतदानासाठी लागणारी बॅलेट युनिट तसेच कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट अशी १२६०० यंत्रे पुणे जिल्हा प्रशासनाकडे असून त्यांची तपासणी सध्या केली जात आहे.

निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाकडून मागवण्यात आलेली माहिती, तसेच जिल्हास्तरावर सुरू असणारी तयारी पाहता लोकसभेची पोटनिवडणूक केव्हाही जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तुम्हाला YOUTUBE वरील ADS चा त्रास होतो? अशा प्रकारे करा ब्लॉक; काही मिनिटांत होईल सुटका

भाजपकडे इच्छुकांची गर्दी : गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेसाठी सत्ताधारी भाजपमध्ये अनेक इच्छुक चेहरे आहेत. यामध्ये बापट यांच्या सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक तसेच माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नावाची सद्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.