BIG NEWS : शिंदे सरकार बचावलं; एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर; सुप्रीम कोर्टानं निकालात काय म्हटलंय पाहा
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टानं अंतिम निकाल जाहीर केला. यामध्ये १६ आमदारांवरील अपात्रतेचा मुद्दा निकाली निघाला असून त्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळं उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार आहेत.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निर्णय देताना उद्धव ठाकरेंना दिलासा देण्यास नकार दिला. कोर्टानं म्हटलं की, उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला समोरे गेले नाहीत. सुप्रीम कोर्टानं पुढे म्हटलं की, उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिला म्हणून ही स्थिती पूर्ववत करता येणार नाही. त्यामुळं सर्वात मोठा पक्ष भाजपच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी शपथ देणे योग्य आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टानं १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडं सोपवला आहे. त्यामुळं आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच याबाबत निर्णय घेणार आहेत. पण हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा असंही सुप्रीम कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.
Supreme Court says the Speaker must decide on disqualification petitions within a reasonable time.
Supreme Court further states that the status quo cannot be restored as Uddhav Thackeray did not face the Floor test and tendered his resignation. Hence, the Governor was justified… https://t.co/Zn81QefXMl
— ANI (@ANI) May 11, 2023
बातमी अपडेट होत आहे…