BIG NEWS : जखमी बिबट्याची दिवे घाटात सफर (Video)

82

लोणी काळभोर (सचिन सुंबे) : आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास  पुणे सासवड रस्त्यावर दिवेघाटात जखमी बिबट्या फिरत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली.

त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून  व्हिडीओ खरा आहे की  खोटा याची पाहणी करण्यासाठी सकाळी  सव्वादहा वाजता वनविभागाची टीम तपासणीसाठी दिवे घाटात आली  असता त्यांना रक्ताचे डाग व कड्याजवळ पायाचे ठसे  सापडले .नंतर रेस्क्यू टीमला  पाचारण  करण्यात आले.

त्यानंतर तीन टीम मध्ये काम करून सर्वत्र पाहणी केली ड्रोन कॅमेराने सुद्धा याची पाहणी करून कड्या कपारीत शोध घेतला .पण बिबट्या काही सापडला नाही मग हे सर्च ऑपरेशन दुपारी तीन वाजता थांबवण्यात आले असल्याची  माहिती वनपरिमंडळ अधिकारी एम  .व्ही .सपकाळे यांनी दिली.

आज रात्री पुन्हा साडेसात नंतर नाईट विजन कॅमेऱ्याद्वारे सर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर कोणाला बिबट्याची काही हालचाल आढळल्यास त्यांनी वनविभागाशी त्वरित संपर्क साधावा असे आव्हान वन विभागातर्फे करण्यात आले आहे.  या व्हिडिओमध्ये जखमी बिबट्या दिवेघाटातील रस्त्यावर फिरत असून एका व्हिडिओमध्ये जखमी बिबट्या रस्त्यावर बसला असून दुसऱ्या व्हिडिओमध्ये गाड्यांच्या मधोमध बिबट्या चालत असून दुचाकीच्या जवळ येत असल्याचे दिसून येत आहे .त्यामुळे दिवे घाटातून जाताना थोडा वेळ घबराटीचे वातावरण झाले होते.