BIG NEWS : गौतमी पाटीलमुळे मांजरीत वाहतूक कोंडी; आयोजक अडकणार कायदयाच्या कचाट्यात; नागरिक संतप्त

63
GAUTAMI PATIL

लोणी काळभोर | सचिन सुंबे

मांजरी हद्दीतील महादेव नगर येथे एका दुकानाच्या उद्घाटनासाठी गौतमी पाटील आल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली.याला जबाबदार असणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महादेवनगर मध्ये एका दुकानाच्या उद्घाटनासाठी काल संध्याकाळी साडेसहा वाजता गौतमी पाटील येणार असल्याचे कळताच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.

त्या गर्दीमुळे मांजरी रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन अनेकांचे हाल झाले त्यामध्ये कंपनीतील कामगार , विद्यार्थी व इतर नागरिकांना या वाहतूक कोंडीमुळे खूपच मनस्ताप सहन करावा लागला.

रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी या वाहतूक कोंडीमुळे एक ते दीड तास जागेवरच थांबावे लागले .त्यामुळे नागरिकांनी प्रचंड मनस्ताप सहन करत आयोजकांनी असे कार्यक्रम स्वतःच्या हद्दीत करावे इथे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास होईल असे कार्यक्रम करु नये.

पोलीस प्रशासनाने आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अनेक नागरिकांनी केली आहे या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप झाला असून संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्याआहेत .याबाबत हडपसर पोलीस प्रशासनाने फक्त बघ्याची भूमिका घेतली असून.

पोलिसांच्या अपुऱ्या संख्येमुळे प्रचंड वाहतूक कोंडी जाणवली. त्यामुळे नागरिकांचा सर्वस्वी विचार करूनच परवानगी द्यावी जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन अशी वाहतूक कोंडी होणार नाही.