बुलढाण्यात शनिवारी पहाटे एक अतिशय मोठी दुर्घटना घडली. यात बसला आग लागून 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना बुलढाणा सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बसमधील आठ प्रवासी सुखरूप आहे. हा अपघात घडला तेव्हा ही प्रवासी बस नागपूरहून पुण्यात जात होती.
शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. यातील 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, आठ प्रवशांना बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. जे लोक सुरक्षित आहेत त्यांच्यात बस चालकाचाही समावेश आहे
हेही वाचा : BIG NEWS : शेतकऱ्यांना मिळणार संरक्षण कवच , अवघ्या एक रुपयात मिळेल पिक विमा!
ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याकडे जात असताना हा अपघात झाला. स्थानिक रिपोर्टनुसार, ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ बस रस्ता दुभाजकावर आदळली. यानंतर बसला आग लागली.
पोलीस आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बस आधी नागपूर-औरंगाबाद रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी खांबाला धडकली आणि नंतर दुभाजकाला धडकली. यानंतर बसला भीषण आग लागली. अपघात झाला त्यावेळी आतील प्रवासी झोपेत होते. त्यामुळे बाहेर पडण्याआधीच 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. यात तीन लहान मुलांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.
पुण्यासह अन्य शहरातील बातम्या झटपट मिळवण्यासाठी आत्ताच व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/JrkOX8HtjDz05Jv9ww3XtY